एक्स्प्लोर

Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत

Bengaluru techie kills wife: साताऱ्याच्या गौरीचा बंगळुरुत सुटकेसमध्ये मृतदेह, महिनाभरापूर्वी मुंबईतून शिफ्ट झालेल्या पती राकेशने पत्नीला का संपवलं? गौरीची चाकू भोसकून हत्या.

मुंबई: बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर याने त्याची पत्नी गौरी सांबरेकर हिची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर (Gauri Sambarekar) हे दोघेही मुंबईत राहणारे होते. दोन वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचे लग्न झाले होते. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी आहे. या दोघांच्याही घरचे नात्यात लग्न करायला तयार नव्हते. मात्र, राकेश (Rakesh Khedekar) आणि गौरी यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. जवळपास चार वर्षे राकेशचे कुटुंबीय त्याला समजावत होते. मात्र, राकेश आणि गौरी यांनी आम्ही लग्न करु तर एकमेकांशीच अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी नाईलाजाने या लग्नाला मंजुरी दिली. मात्र, या प्रेमकहाणीचा इतका भयंकर शेवट होईल, याची कल्पनाही कोणीही केली नव्हती.

प्राथमिक माहितीनुसार, राकेश आणि गौरी महिनाभरापूर्वीच बंगळुरुला राहायला गेले होते. गौरीने मास मिडीयाचे शिक्षण घेतले होते. तीदेखील बंगळुरुत नोकरी शोधत होती. मंगळवारी रात्री राकेश आणि गौरी यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी राकेशने संतापाच्या भरात किचनमधील चाकूने तीनवेळा गौरीच्या शरीरात खुपसला होता. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव होऊन गौरीचा मृत्यू झाला. राकेशने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर राकेश पळून पुण्याला आला होता. 

राकेशचा वडिलांना फोन, म्हणाला, मी तिला मारलं, ती खूप त्रास देत होती

राकेश खेडेकर याने गौरीचा खून केल्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या आपल्या वडिलांना फोन केला. मंगळवारी रात्री 12 वाजता त्याने वडिलांना फोन केला होता. त्यानंतर सकाळी त्याने मला पुन्हा फोन केल्याचे वडिलांना सांगितले. तो वडिलांना म्हणाला की, मी असं असं केलं आहे, ती माझ्याशी खूप भांडत होती, त्रास देत होती, असे राकेशने सांगितले. 

राकेशच्या वडिलांनी सांगितले की, गौरी ही माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी होती. ती माझी भाची होती. गौरी सतत भांडायची. तिच्या आईनेही तिला समजावले होते. गौरीची आई 86 वर्षांची आहे. जोगेश्वरीला राहत असताना तिलादेखील गौरीने खूप त्रास दिला होता. तेव्हादेखील हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. गौरी सुरुवातीपासूनच मानसिक रुग्णासारखी वागायची. तिने एकदा तिच्या भावालाही मारले होते. आम्हाला ही गोष्ट माहिती होती. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे तिच्याशी लग्न लावून द्यायला तयार नव्हतो. आम्ही चार वर्षे थांबलो होतो. मात्र, त्यावेळी राकेश आणि गौरी कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. आम्ही एकमेकांशी लग्न करु, नाहीतर करणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ते ऐकत नसल्याने मग आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं, असे राकेशच्या वडिलांनी सांगितले.

गौरीच्या आईला सांगा मी तिला मारलंय: राकेश खेडेकर

राकेशने मला फोन करुन सांगितले की, मी गौरीला मारले आहे. तुम्ही ही गोष्ट सगळ्यांना सांगा, तिच्या आईलाही सांगा. आता मीदेखील स्वत:ला संपवणार असल्याचे तो म्हणाला. मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी थेट जोगेश्वरी पूर्वचे पोलीस ठाणे गाठून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी राकेशला फोन केला. राकेशने स्वत:च पोलिसांना बंगळुरुतील फ्लॅटचा पत्ता पोलिसांना दिला. 

आणखी वाचा

साताऱ्याच्या गौरीचा बंगळुरुत सुटकेसमध्ये मृतदेह, महिनाभरापूर्वी मुंबईतून शिफ्ट झालेल्या पती राकेशने पत्नीला का संपवलं?

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget