एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dil Bechara Movie Review | हूरहूर..हळहळ आणि वेदना!

Dil Bechara Movie Review : दिल बेचारामध्ये अनेक प्रसंगात प्रेक्षक म्हणून आपण मॅनी आणि सुशांत या दोघांच्या परिस्थितीसोबत वास्तवाला जोडत राहतो. त्यातून येणारी हळहळ ही सिनेमापलिकडची असते.

Dil Bechara Movie Review : दिल बेचारा.. हा मुकेश छाब्रा यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा. अर्थात याची गोष्ट ओरिजिनल त्यांची नाही. 2014 मध्ये आलेल्या द फॉल्ट इन अवर स्टार्स या सिनेमावरून हा चित्रपट प्रेरित आहे. अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत या सिनेमाची अशीच चर्चा होती. पण 14 जूनला एक हादरवून टाकणारी घटना घडली आणि या सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण या सिनेमाचा नायक असलेल्या सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. साहजिकच हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याचं अचानक निघून जाणं.. त्यानंतर आलेले वाद.. आणि त्यातून या सिनेमाची जाहीर झालेली तारीख.. यामुळे सुशांतसह एकूणच भारतभरातल्या सिनेप्रेमींना या सिनेमाची उत्कंठा होती. खरंतर तो यातला क्लायमॅक्स नाहीच. मुळात एक गोष्ट सरळ आहे की हा काही आऊटस्टॅंडिंग सिनेमा नाही. किंवा हा विलक्षण अनुभव देणारा चित्रपटही नाही. हा एक सरळ साधा सिनेमा आहे. पण यातली सगळ्यात धक्का देणारी बाब आहे ती या सिनेमाची गोष्ट.. सिनेमाचा शेवट आणि वास्तव. सिनेमातला प्रेक्षक आणि हा सिनेमा पाहणारा प्रेक्षक.. म्हणजे आपण आता एकच आहोत ही भावना भयंकर अस्वस्थ करते. वेदना देते. हळहळ आणि हूरहूर माजवते. किजी बसू आणि मॅन्यूअल राजकुमार ज्युनियर या दोघांभवती फिरणारी ही गोष्ट. दोघांनाही वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलं आहे. किझी आपल्या आजाराने एकाकी पडत चालली आहे. नैराश्यात आहे. अत्यंत यंत्रवत पद्धतीने ती जगते आहे. अशावेळी तिची भेट होते मॅनीशी. मॅनी आणि किझीचे डॉक्टर एक आहेत. त्यावेळी कळतं की मॅनीलाही एक आजार आहे. पण उलट तो जगण्याकडे कमालीच्या सकारात्मक उर्जेने पाहातो आहे. अशात त्याला किझी दिसते. आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तो करू लागतो. त्यातून हळूहळू त्यांची मैत्री होते. मग त्याचं रूपांतर प्रेमात होतं. अर्थात तेवढी त्याची गोष्ट नाही. कारण त्या गोष्टीला आजारांची किनार आहे. दोघांकडेही मर्यादित वेळ आहे. तो अधेमधे डोकावत असतोच. यातून ही गोष्ट पुढे जाते. अशा गोष्टी घेतल्या की जगण्याची मरण्याची.. फिलॉसॉफी दिसते. म्हणजे अशा सिनेमातून ती बाहेर येणं अपेक्षित आहे. पण तसं इथे होत नाही. सिनेमा टप्प्याटप्प्याने पुढे जातो. शिवाय सिनेमाभर ज्या अभिमन्यू वीरचा संदर्भ येत राहतो.. ज्या अपूर्ण गाण्याचा संदर्भ येतो तो सीन तर फारच पोकळ झाला आहे. खरंतर त्या तिघांच्या संवादातून काहीतरी सकस, काळजात हात घालणारं बाहेर यायला हवं होतं असं वाटून जातं. म्हणून केवळ सुशांतचा चित्रपट म्हणून आपण ते समजून घेतो. पूर्वार्धात उत्स्फूर्त मॅनी पाहताना, सुशांत आज हवा होता. इतका एनर्जेटिक मुलगा असा कसा नाहिसा झाला असं वाटत राहतं. आणि चित्रपटाच्या उत्तरार्धात, मॅनीची अवस्था आणि सुशांतचं नसणं हळूहळुु एकरुप होऊ लागतं. म्हणून प्रेक्षक म्हणून सुशांतच आज आपल्यात नसणं अधिक गहिरं होऊ लागतं. सिनेमा अस्वस्थ करतो ते या भावनेमुळे. सिनेमात असलेली गाणी.. त्याचं संगीत, छायांकन, कलादिग्दर्शन हा बाबीत काही खटकणारं नाही. पण त्याच्या पटकथेमध्ये आणि पर्यायाने संवाद लेखनामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टीतून जे अपेक्षित आहे ते आणखी नेटाने बाहेर यायला हवं होतं असं वाटून जातं. चित्रपटात सर्वांनी चोख कामं केली आहेत. संजना संघीचाही हा खरंतर पहिला चित्रपट आहे. तिने अत्यंत आत्मविश्वासाने किझी रंगवली आहे. यातले काही प्रसंग सहकलाकारांमुळे छान झाले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो मॅनी आणि किझीच्या वडिलांचा. भर पावसात झोपाळ्यावर बसून त्यांच्या जो संवाद दाखवला आहे तो कलाकारांच्या अभिनयामुळे आत घुसतो. जीना और मरना हमारे हाथ नहीं होता. हम कैसे जिते है यह जरूरी है हा संवाद मॅनीच्या तोंडी आल्यानंतर आपल्या मनात लगेचच पडद्यावरच्या सुशांतसाठी प्रश्न तयार होतो, इथे मरण त्यानेच ठरवलं. एका प्रसंगात मॅनी म्हणतो, मैने हमेशा बडे सपने देखे लेकीन उसे कभी पुरा किया नही. हा संवाद आल्यावर सुशांतलाही असंच वाटलं असेल का असं वाटून जातं. अशा अनेक प्रसंगात प्रेक्षक म्हणून आपण मॅनी आणि सुशांत या दोघांच्या परिस्थितीसोबत वास्तवाला जोडत राहतो. त्यातून येणारी हळहळ ही सिनेमापलिकडची असते. मुकेश छाब्रा सुशांतचा चांगला मित्र. त्याने सुशांतला घेऊन त्याच्यासाठी सिनेमा बनवला. तो तयार केला. पण रिलीज करताना त्याचा जवळचा हा मित्र हयात नव्हता. मग इतर सगळ्यांना घेऊन हा सिनेमा तो रिलीज करतो आहे. पण त्याचा मित्र तिथे नाहीय. सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याची उणीव भासते आहे.. आता हे सत्य आहे.. सिनेमा यापासून वेगळा काढता येत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर येणारी अस्वस्थता यामुळे येते. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळाताहेत तीन स्टार्स.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget