Parbhani News : मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
Parbhani : परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे.

Parbhani News : परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा (Somnath Suryavanshi) मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे. दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवाल आता एबीपी माझाच्या हाती लागला असून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणाचं प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.
दरम्यान, न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेलं आहे. तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. मात्र राज्य सरकारनं अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषींवर कारवाई हवी आहे, अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्यानं करत आहेत.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा (Somnath Suryavanshi) मृत्यू झाला, असा आरोप सातत्याने करण्यात आला होता. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून, पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली होती. अशातच आता न्याय दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने यात पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितलं आहे. “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली” असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा 451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
