एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये आंतरजातीय प्रेमातून मुलाची निर्घृण हत्या, शीर धडापासून वेगळं केलं
त्या दोघांनी प्रेम केलं आणि घरातून निघून गेले. मात्र याची मोठी किंमत मुलाच्या घरच्यांना मोजावी लागली. चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मुलाचा खून केला. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.

औरंगाबाद : पुरोगामी महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा झुकली आहे. औरंगाबादमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणीच्या वडील आणि काकांनी 17 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत शीर धडावेगळं केलं. तसंच त्याच्या आई-वडिलांवरही कोयत्याने वार केले.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यतील लाख खंडाळा गावच्या शेतवस्तीवर शनिवारी (14 मार्च) मध्यरात्री हा थरार घडला. मुलीचे वडील आणि काका या दोघांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. बाहेर झोपलेल्या तरुणाच्या मानेवर कोयता मारत, शीर धडावेगळे केले आणि घरात झोपलेल्या त्याच्या आई-वडिलांवरही कोयत्याने जीवघेणे वार केले. कसाबसा जीव वाचवून दाम्पत्य पळालं, मात्र 17 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबातील मुलाचं आणि गावातच अगदी हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं. लग्न करण्यासाठी हे दोघे घरातून पळून गेले. मात्र याची किंमत मुलाच्या घरच्यांना मोजावी लागली. चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी मध्यरात्री मुलाचं घर गाठलं आणि त्याची निर्घृण हत्या केली. तर त्याच्या आई-वडिलांवरही हल्ला केला. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर मुलाचे नातवाईक चांगलेच संतापले आहेत. जगात सगळे लग्न करतात मग आमच्या पोराचं काय चुकलं असा प्रश्न मुलाचे आजोबा डोळ्यात पाणी आणून विचारत आहेत. दोघांना जरी अटक केली तरी आरोपी जास्त आहेत त्यांनाही अटक करा, अशी मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. खरंतर पोरांनी प्रेम केलं आणि पालकांनी घर उद्ध्वस्त केलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आजही मुलांनी मनाविरोधात लग्न केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा पाशवी संदेशच जणू या घटनेतून मिळत आहे. आरोपींना अटक झाली, शिक्षा सुद्धा होईल, मात्र या मानसिकतेचा काय करायचं हाच मूळ प्रश्न आहे. गावाप्रमाणे शहरातल्या तरुणाईवरही सैराटचं सावट | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
