एक्स्प्लोर

Women Health : महिलांनो... गरोदरपणात धूम्रपान करणं पडेल चांगलच महागात! जन्मत: मुलाचं फुफ्फुस होतं लहान, जाणून घ्या धोके

Women Health : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, धुम्रपान करणाऱ्या महिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलांची फुफ्फुसे लहान असतात. एवढेच नाही तर अनेक दुष्परिणाम होतात. जाणून घ्या...

Women Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांच्या सवयींचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. आजकाल महिलाही बदलत्या काळानुसार मद्यपान किंवा धूम्रपान करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का? त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर करतेच, सोबत त्यांच्या मुलांच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या मुलांची फुफ्फुसं लहान असतात. यामुळे लहानपणीच मुलांना दमा होण्याची शक्यता असते. सिगारेट, बिडी, हुक्का आणि ई-सिगारेट यांसारख्या सर्व प्रकारच्या धूम्रपानामुळे मुलांच्या शरीराला हानी पोहोचते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आणखीही काही धोके आहेत, ते जाणून घ्या...

केवळ फुफ्फुसच नाही, तर संपूर्ण शरीराचे नुकसान होते

WHO च्या रिपोर्टनुसार, धुम्रपानाचा परिणाम फक्त फुफ्फुसापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर होतो. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या मुलांना आयुष्यभर फुफ्फुसाच्या आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या प्रकारच्या मुलांमध्ये शारिरीक क्षमता कमी असते आणि त्यांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका जास्त असतो.

उपचार करण्यात अडचण

पौगंडावस्थेतील आणि प्रौढावस्थेमध्ये धूम्रपानामुळे औषधाचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे दम्याचा उपचार करणे कठीण होते. धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांमध्ये दम्याचा उपचार अधिक आव्हानात्मक असू शकतो.

धूम्रपानाचे परिणाम

"मदर्स अगेन्स्ट वेपिंग" राष्ट्रीय मोहिमेशी संबंधित तज्ज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वरुणा पाठक  यांनी सांगितले की, धूम्रपानाचे परिणाम केवळ गर्भवती महिलांपुरते मर्यादित नाहीत. घरात कोणी धूम्रपान करत असेल, तर लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे, कारण त्याचा त्यांच्या फुफ्फुसांवर आणि एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

तंबाखू नियंत्रणासाठी समुपदेशनाचे महत्त्व

जिल्हा तंबाखू नियंत्रण संनियंत्रण पथकाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान 650 लोक समुपदेशनासाठी पोहोचले. यापैकी 77 टक्के पुरुष आणि 23 टक्के महिला होत्या. यावरून तंबाखू नियंत्रणाबाबत जनजागृती वाढत असली तरी अजून म्हणावी तितकी झालेली नाही

Phyno चाचणी, श्वसन चाचणी

रिजनल रेस्पिरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये दम्याचे निदान करण्यासाठी Phyno चाचणीचा वापर केला जातो. ही चाचणी श्वासामध्ये नायट्रिक ऑक्साईड वायूचे प्रमाण मोजते. जर हा वायू श्वासामध्ये जास्त प्रमाणात असेल तर फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये जळजळ होऊ शकते, जे दमा, ऍलर्जी किंवा एक्जिमाचे लक्षण असू शकते. हा अहवाल पाहता धुम्रपान संबंधित जागरूकता, त्याचे धोके समजून घेणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे बनवते.

हेही वाचा>>>

Women Health : गरोदर असताना महिलांना हृदयविकार होऊ शकतो? काय काळजी घ्याल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....ABP Majha Headlines : 07 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBajrang Sonawane On Santosh Deshmukh Case : हत्येच्या तपासावर समाधानी नाही : बजरंग सोनवणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
Buldhana Hair Loss : केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
Embed widget