एक्स्प्लोर

राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा

उदयनराजे बोलताना म्हणाले, या जगाच्या पाठीवर एकमेव राजा, महापुरुष झाले ज्यांनी जगाला विचार दिले, त्याच विचाराच्या आधारावर देश नाही तर अनेक देश चालत आहेत.

मुंबई : अभिनेता राहुल सोलापूरकरने (Rahul solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांकडूनही सोलापूरकरच्या वक्तव्यावर टीका करताना त्याला जिथं दिसेल तिथं बदडा अशी भावना व्यक्त होत आहे. खासदार आणि शिवरायांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje) आणि आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूकर कोण आहे, अशांना गोळ्या घालायला पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटलं. तर, राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोललेला आहे. तो जिथे दिसेल तिथे लोकांनी त्याला बदडून काढावं. कवठ्या महांकाळ जे बोलला ते अतिशय चुकीचं आहे, अशा विकृती महाराष्ट्रात पैदाच कशा होतात, हा माझा प्रश्न आहे, असे सुरेश धस यांनी म्हटलं आहे. 

उदयनराजे बोलताना म्हणाले, या जगाच्या पाठीवर एकमेव राजा, महापुरुष झाले ज्यांनी जगाला विचार दिले, त्याच विचाराच्या आधारावर देश नाही तर अनेक देश चालत आहेत. एकता हा महाराजांचा मूळ मंत्र होता, लोकशाहीचा पाया शिवाजी महाराजांनी रचला, त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. वेगवेगळ्या जातीच्या लोकांकडे त्यांनी कुटुंब म्हणून पाहिलं. एका विचाराच्या आधारावर आपण वागत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही, असे म्हणत अभिनेता राहल सोलापूरकरने केलेल्या वक्तव्यावरुन खासदार उदयराजे भोसले यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.  

गोळ्या घालून मारलं पाहिजे

राहुल सोलापूर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा हसाडल्या पाहिजेत. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेत वाढ होईल, आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. अमित शाह यांची देखील भेट घेऊन कडक शिक्षा करण्याची मागणी करणार आहे, यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे, या लोकांना गाडलं पाहिजे. मी याचा कठोर शब्दात निषेध करतो, याला गोळ्या घालून मारल पाहिजे असं मला वाटतं, अशा शब्दात उदयनराजेंनी तीव्र संताप व्यक्त केला.  

तुरुंगात टाकलं पाहिजे

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांनी देशाला पुढे नेलं, दुसरा काही पर्याय मला दिसत नाही. जिथं अशी लोक दिसतील त्यांना तिथंच ठेचा, यांना वेळीच आळा घातला नाही तर आपल्या इतिहासाला वेगळं वळण देतील. कारण, एकमेव शिवाजी महाराज आहेत ज्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. परकीय आक्रमण रोखून संपूर्ण समजाच संरक्षण राजांनी केलं. त्यामुळे, महाराजांबद्दल असं बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे. औरंगजेब हरामखोर होता, तू कमी हरामखोर आहेस का?  राहुल्या, तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटतं, त्याचा पोलीस बंदोबस्त काढून घ्यावा. पोलिसांना दुसरा उद्योग नाही का? जनतेच्या रेट्यापुढे पोलीस काही करू शकत नाही. लोकांपेक्षा पोलीस किती आहेत, जनता काही गप्प बसणार नाही, असे म्हणत उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

व्हिडिओ व्हायरल, सेन्सॉरशीप हवी

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याबाबत डिजिटल सेन्सॉरशिप हवी आहे, इतिहासाची माहिती असणाऱ्याकडून याची तपासणी झाली पाहिजे. व्हायरल झालेले व्हिडिओ आता कसे थांबवणार? मूळ छाटले तर असा प्रश्न उद्भवणार नाही. राज्यातील सरकार हे महाराजांच्या विचारांचं आहे. मी त्या पक्षाचा घटक, घराण्याचा म्हणून बोलत नाही. मी हे एक शिवभक्त म्हणून बोलत आहे. शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी या पक्षांनी शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग केला. शिवाजी महाराजांचे विचार भाजपने आचरणात आणले, गुन्हा दखल झालाच पाहिजे. राहुल सोलापूरकरला तुरुंगात टाकून कडक शिक्षा झाली पाहिजे, असेही उदयनराजे यांनी म्हटलं. 

छावाच्या दिग्दर्शकांनी घेतली भेट

छावाचे दिग्दर्शक उतेकर माझ्याकडे आले होते, त्यांना मी लेझीम सीनबाबत बोललो, ते म्हणाले आम्ही तो सीन काढणार आहोत. आता तो सीन काढतील पण लोकांच्या मनात दुःख झालं त्याच काय? लोकांच्या भावना कोण समजून घेणार?, असाव सवालही उदयराजेंनी उपस्थित केला. दरम्यान, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा आतापर्यंत व्हायला पाहिजे होता. पण, तिथे खर्च होणारे पैसे किल्ल्यांवर खर्च करायला पाहिजे, असेही मत उदयनराजेंनी मांडले. 

हेही वाचा

आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
Embed widget