Shani Dev : शनिदेव आणि उडीद डाळीचा खास संबंध! नशीब चमकेल, 'या' उपायांमुळे होईल शनिदेवाची विशेष कृपा
Shani Dev : शनिवारी उडीद डाळीचे काही खास उपाय केल्यास शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. आर्थिक लाभ आणि नशीब बलवान करण्यासाठी हे उपाय खूप उपयुक्त मानले जातात. जाणून घ्या

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सुचवले आहेत ज्याचा वापर करून ग्रहांना शांत आणि मजबूत करता येते. उडदाची डाळ चवीला चविष्ट लागते, पण त्यासंबंधीचे ज्योतिषीय उपाय देखील विशेष फायदे देतात. शनिवारी उडीद डाळीचे काही खास उपाय केल्यास शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी केलेल्या उपायांमुळे कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे शनिदेव कसे प्रसन्न होतात? ते जाणून घ्या
उडीद डाळीचे उपाय अत्यंत प्रभावी
ज्योतिषशास्त्रात उडीद डाळीचे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. आर्थिक लाभ आणि नशीब बलवान करण्यासाठी हे उपाय खूप उपयुक्त मानले जातात. विशेषत: उडीद डाळीचे उपाय शनिवारी केल्या तर विशेष फायदा होतो. शनिवारी उडीद डाळीसोबत या युक्त्या केल्याने तुम्हाला शनिदेवाचीच नव्हे तर देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. या उपायांबद्दल जाणून घेऊया.
उडीद डाळ उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी संध्याकाळी उडीदाचे दाणे, थोडे दही आणि सिंदूर मिसळून पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. परत येताना चुकूनही मागे वळून पाहू नका. हे उपाय 21 दिवस सतत करा. या उपायाने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात.
जर तुम्हाला शनिदोषाने त्रास होत असेल तर उडीद डाळीचा हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे. शनिवारी काही उडीद डाळ डोक्यावरून 3 वेळा फिरवून कावळ्यांना खायला द्या. सात शनिवार असे सतत केल्याने शनिदोष दूर होतो.
शनिवारी एका भांड्यात मोहरीचे तेल पलंगाखाली ठेवावे. दुस-या दिवशी या तेलात उडीद डाळी मिक्स करून त्याची पोळी बनवून कुत्र्यांना आणि गरिबांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने गरिबी दूर होते.
जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर काळ्या उडदाच्या डाळीचा हा उपाय नक्की करून पाहा.
कोणतीही लोखंडी वस्तू आणा आणि तुमच्या नवीन कार्यालयात ठेवा. ज्या ठिकाणी हे लोखंड ठेवायचे आहे. त्याखाली स्वस्तिक बनवून त्यावर थोडे काळे उडीद ठेवावे. आता ती लोखंडी वस्तू त्याच्यावर ठेवा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात झपाट्याने प्रगती होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : शनिवारी 'अशा' पद्धतीने करा शनिदेवाची पूजा! शनि ढैय्या,साडेसातीपासून मिळेल मुक्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
