Sleep And Age : कोणत्या वयात किती तासांची झोप गरजेची, जाणून घ्या...
Sleep According To Age : शारीरिक आणि मानसिक विकासासाठी झोप अतिशय महत्त्वाची आहे. वयानुसार व्यक्तीसाठी किती तास झोप महत्त्वाची आहे हे जाणून घ्या.
Relation Between Sleeping Hours And Age : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप (Sleep) खूप महत्त्वाची असते. झोपताना मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. यामुळे प्रौढांपेक्षा जास्त लहान मुलांना झोपचे आवश्यकता असते. म्हणूनच लहान मुले प्रौढांपेक्षा जास्त झोपतात. त्यानंतर जसजसे वय वाढत जाते तसतसे झोपेचे तास कमी होत जातात. मात्र 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला 7 ते 8 तासांची झोप गरजेची असते.
झोपेची गरज आणि त्याचे फायदे
- शरीर शांत होण्यासाठी, स्नायूंचा ताण दूर करण्यासाठी आणि पेशींची दुरुस्ती करण्यासाठी झोप आवश्यक आहे.
- झोपेमुळे मानसिक तणाव दूर होऊन मन शांत होण्यास मदत होते. यामुळे तुमचा मेंदू जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार होतो.
- केवळ झोपेचे तासच नाही तर झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य झोपेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
- कार्यक्षमता आणि भावनिक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आणि गाढ झोप आवश्यक आहे.
- वयानुसार पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मेंदू सुरळीत काम करतो, हृदय निरोगी राहते आणि किडनी, यकृताच्या समस्याही दूर राहतात.
- शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी मन शांत ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.
- नवीन भाषा शिकण्यापासून ते काम आणि करिअर नियोजनापर्यंत, सर्व कार्यांमध्ये सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी पुरेशी तास गाढ झोप घेणं आवश्यक आहे.
कोणत्या वयात तुम्ही किती तास झोपावे?
नवजात मुलांसाठी
- 1 ते 4 आठवड्यांच्या बाळाला दिवसातून 15 ते 17 तासांची झोप
- 1 ते 4 महिन्यांच्या बाळाला 14 ते 15 तासांची झोप
- 4 महिने ते 12 महिन्यांच्या बाळाला 13 ते 14 तासांची झोप
एक वर्षाहून अधिक
- 1 ते 3 वर्षांच्या मुलास 12 ते 13 तासांची झोप
- 3 ते 6 वर्षांच्या मुलासाठी 10 ते 12 तासांची झोप
6 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटासाठी
- 6 ते 12 वर्षांच्या मुलाने दररोज सुमारे 9 ते 10 तास झोप
- 12 ते 18 वयोगटातील मुलांनी दररोज 8 ते 10 तासांची झोप
- 18 वर्षांवरील सर्व लोकांनी दररोज 7 ते 8 तास झोप
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Dehydration : पुरेसं पाणी पिऊनही होतं डिहाइड्रेशन, जाणून घ्या लक्षणं
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
- Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, 'ही' आहेत लक्षणे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )