(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Healthier Eyes : दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स...
Healthier Eyes : सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने तसेच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतात.
Tips for Healthier Eyes : शरीरातील सर्वात नाजूक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा. डोळ्यांची नजर चांगली राहावी आणि सध्याच्या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून आपण आपल्या परिने बरीच काळजी घेत असतो. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने तसेच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतात. एकदा दृष्टी कमजोर झाली की मग एकतर चष्मा सतत डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सतत डोळ्यांच्या दवाखान्यात फे-या घालाव्या लागतात. या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी निरोगी डोळ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्या कोणत्या हे जाणून घ्या.
निरोगी डोळ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स...
1. जास्तीत जास्त वेळा डोळ्यांची उगड-झाप करा (मिचकवा).
यामुळे तुमच्या डोळ्यांचा व्यायाम होईल तसेच कोरड्या डोळ्यांपासून सुटका मिळेल.
2. नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा.
तुमचे डोळे नियमितपणे डोळ्यांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे तपासा. यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
3. तुमच्या डिव्हाईसचा ब्राईटनेस कमी करा.
तुम्ही जितका डिव्हाईसचा ब्राईटनेस डार्क ठेवाल तितका जास्त तुमच्या डोळ्यांना त्रास होईल. यासाठी अंधारात मोबाईल वापरणे बंद करा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
4. 20-20-20 नियम पाळा.
स्क्रिनपासून 20 सेकंद आणि 20 फूट लांब राहा. आळीपाळीने 15 मिनिटांचा ब्रेक घेऊन कोणत्याही डिजीटल डिव्हाईस वापरा. उदा...लॅपटॉप, मोबाईल. संगणक,. डिजीटल डिव्हाईस वापरताना 2 तासांच्या अवधीनंतर 15 मिनिटांचा ब्रेक घ्या.
5. पौष्टीक पदार्थ खा.
जसे की, ओमेगा -3 फॅटी अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन सी आणि ई हे तुमचे डोळे तुमच्या वयानुसार निरोगी ठेवण्यास मदत करतील. तुमच्या आहारात पालक, फरस्बी, अंडी, शेंगदाणे यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय
- Hip Bone Symptoms : राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया; हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती
- Dehydration for Diabetics : मधुमेह आणि डिहायड्रेशनचा एकत्र त्रास होतोय? काळजी करू नका, 'हे' सोपे उपाय करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )