Dehydration for Diabetics : मधुमेह आणि डिहायड्रेशनचा एकत्र त्रास होतोय? काळजी करू नका, 'हे' सोपे उपाय करा
Dehydration for Diabetics : मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी काही सोपे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते.
Dehydration for Diabetics : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. कडक उन्हामुळे सर्वांनाच उन्हाच्या झळा सोसाव्या लागतायत. अशातच अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. तर काहींमध्ये डिहायड्रेशन आणि मधुमेह एकत्र दिसून येतात. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे रक्तात साखर तयार होते. आणि या साखरेला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मुत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते.
या समस्येमुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना वारंवार मूत्र विसर्जन करावे लागते. ज्यामुळे डिहायड्रेशन होते. या समस्येवर नेमका उपाय काय हे जाणून घ्या.
या संदर्भात डॉ. शुभदा भनोत प्रमुख मधुमेह प्रशिक्षक मॅक्स रुग्णालय यांनी असे सांगितले आहे की,''मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो. कारण रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक जास्त प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. तथापि, खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल तर, वैद्यकीय आधारभूत सल्ला आहे की तुम्हाला अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) दिले जाऊ शकतात.''
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी काही उपाय
द्रव पदार्थांचे सेवन : शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यााठी तुम्ही द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्ही नारळाचे पाणी, साधे ताक,किंवा साखर नसलेले लिंबू पाणी पिऊ शकता.
उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याबाबत जागरूक राहणे : मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो. तसेच संबंधित परिस्थितीत ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधित काही गुंतागुंत जसे की, रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचे नुकसान यांचा परिणाम घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो. ज्यामुळे शरीर प्रभावीरित्या थंड होत नाही. यामुळे उष्माघात आणि उष्णतेचा थकवा येऊ शकतो. चक्कर येणे, मोठ्या प्रमाणात घाम येणे, बेशुद्ध होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे आणि उलटी होणे ही सर्व थकव्याची लक्षणे आहेत. या लक्षणांच्या बाबतीत जागरूक असणे अत्यावश्यक आहे.
रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे : डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही याबबात सतत जागरूक असणे. काही स्मार्ट सीजीएम यंत्र आहेत. जसे की, फ्रीस्टाइल लीबर यामध्ये आपण न टोचता सतत साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवू शकतो.
व्यायाम करताना थंड राहावे : उन्हाळ्यात मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी व्यायामासाठी बाहेर न जाता घरीच व्यायाम करावा. किंवा मग सकाळच्या थंड वातावरणात घराबाहेर पडावे.
खरंतर डिहायड्रेशन हा सर्वांच्याच काळजीचा मुद्दा आहे. परंतु, मधुमेह असणाऱ्यांनी मात्र याकडे नक्कीच गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. मधुमेह आणि डिहायड्रेशन त्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी काही साधे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Monkeypox: अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार, हा आजार किती धोकादायक, कसा बचाव कराल?
- Hip Bone Symptoms : राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया; हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )