![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय
Hypertension in Adults : सामान्यत: व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब असल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हणजेच Hypertension असे म्हणतात.
![Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय Health news Hypertension in Adults know its solution health tips marathi news Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/8322c7dddc4e755f3bd72069bb43468c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hypertension in Adults : सध्याचे तणावग्रस्त जीवन, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तबादाचे प्रमाण तरूणांमध्ये अधिक वाढले आहे. तरूण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे हृदयविकारात होत आहे. सामान्यत: व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब असल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हणजेच Hypertension असे म्हणतात.
हायपरटेन्शन हा एक प्रकारचा 'सायलेंट किलर'
या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा म्हणतात, उच्च रक्तदाब हा एक प्रकारचा सायलेंट किलर आहे. कारण याची शरीरात कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. आणि त्यामुळे हा कधी निर्माण होतो हे ही कळत नाही. यामुळे आपले हृदय, किडनी, डोळे, मेंदू या अवयवांवर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि यामुळेच किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, दृष्टी जाणे यांसारखे गंभीर परिणाम होतात.
उच्च रक्तदाबावर उपाय काय?
मिठाचे प्रमाण कमी करणे : आपल्याला जेवणात मीठ लागतेच. मिठामुळे अन्नाला चव येते. परंतु, हेच मीठ तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. बाहेरच्या खाद्यपदार्थांवर तर हमखास मीठाचे प्रमाण जास्त असते. अनेकांना दही, सॅलड, यामध्ये वरून मीठ टाकायची सवय असते. तसेच काही बेकरी प्रोडक्ट्स, वेफर्स, चीझ, सॉस यामध्ये मिठाचा वापर अधिक असतो. त्यामुळे तुमच्या आहारातून लगेच हे पदार्थ बाजूला करा.
अल्कोहोल आणि कॅफेन टाळा : अतिप्रमाणात अल्कोहोल केल्यास तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. पुरुष आणि स्त्रिया दोघेही अल्कोहोल घेऊ शकतात. परंतु याचे प्रमाण कमी असावे. तज्त्रांनी आठवड्यातून सरासरी 14 युनिट्सपेक्षा जास्त अल्कोहोल न पिण्याची शिफारस केली आहे.
रक्तदाब नीट तपासला नाही तर : अनेकदा लोक रक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. तर काही लोक घरीच तपासतात. अनेकदा हा रक्तदाब नीट तपासला जात नाही. त्यामुळे सुद्धा तुमचा रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे तो नीट तपासा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे : अनेकदा कोणताही आजार किंवा दुखापत झाल्यास आपण डॉक्टरांकडे न जाता घरीच पेन किलरच्या (Pain Killer) गोळ्या घेतो. यामुळे तुमचं दुखणं जरी कमी होत असलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळाय यामुळे तुमच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Monkeypox: अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार, हा आजार किती धोकादायक, कसा बचाव कराल?
- Hip Bone Symptoms : राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया; हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती
- Dehydration for Diabetics : मधुमेह आणि डिहायड्रेशनचा एकत्र त्रास होतोय? काळजी करू नका, 'हे' सोपे उपाय करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)