Winter Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची निगा कशी राखाल? 'या' सात टिप्स लक्षात ठेवा
Hair Care Tips in Winter : हिवाळ्यातील कोरडी हवा आणि कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे केसांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. हिवाळ्यातील केसांसंबंधी समस्या टाळण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

Hair Care Tips in Winter : हिवाळ्यातील (Winer)कोरडी हवा आणि कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे केसांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो आणि टाळूवरील त्वचा कोरडी हेऊन खपली येते. हिवाळ्यातील केसांसंबंधी समस्या टाळण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.
हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी?
1. तेल लावायला विसरु नका : हिवाळ्यात टाळूवरील त्वचा कोरडी होऊन खाज सुटते आणि त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता वाढते. आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना आणि टाळूवर थोडेसे कोमट तेल मसाज केल्याने केसांच्या मुळांचे पोषण होण्यास मदत होईल. हिवाळ्यात तेल लावल्याने केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होण्यास मदत होते तसेच केस आणि टाळू मॉइश्चराईज होतात. नारळ, रोझमेरी, बदाम, तीळ, ऑलिव्ह, जोजोबा इत्यादी तेलांचा वापर करुन पाहू शकता.
2. केस जास्त वेळा धुण्याचे टाळा : नैसर्गिक तेल स्रावामुळे हिवाळ्यात टाळू खूप तेलकट बनते. जास्त वेळा केस धुण्याचा मोह टाळावा. आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा केस धुणे योग्य राहिल. तुमचा शॅम्पू आणि कंडिशनर सल्फेट आणि पॅराबेन फ्री असावे.
3. कंडिशनिंग करा : शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर कधीही वगळू नका. केसांना कंडिशन करण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात. असे कंडिशनर शोधा ज्यात नारळापासून तयार केलेली उत्पादने आहेत जसे की सेटाईल अल्कोहोल जे प्रत्येक थराचे संरक्षण करतात आणि केसांना मॉइश्चराईज करतात. अशाप्रकारे तुम्ही तुमचे केस कोरडे होण्यापासून वाचवू शकता आणि केस तुटणे देखील टाळू शकता. कंडिशनर केसांच्या मुळांना न लावता खालच्या दिशेने केसांच्या टोकापर्यंत लावा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
4. ओल केस घेऊन कधीही बाहेर पडू नका : हिवाळ्यात केस सुकवणे हे एक मोठे काम आहे. परंतु ओल्या केसांनी हवेत बाहेर पडणे अधिक नुकसानकारक ठरेल. हिवाळ्यातील हवेत ओले केस जास्त प्रमाणात तुटतात. केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या परंतु टॉवेलने जोरात घासू नका.
5. ब्लो ड्राय वापरु नका : थंडीच्या दिवसात केस सर्वात कमकुवत होतात आणि अशा कमकुवत केसांवर उष्णतेचा वापर केल्याने केस तूटू शकतात. हिवाळ्यात केसांना ब्लो ड्रायरचा वापर करु नका.
6. केस खालच्या दिशेने विंचरा : के कोरडी हवा केसांना शुष्क बनवतात. त्यामुळे केसांचे नुकसान होते आणि केस तुटण्याचे प्रमाण वाढते. म्हणून, लिव्ह इन कंडिशनर लावा, रेशमी स्कार्फ वापरा. टाळूवरील ताण कमी करण्यासाठी केस खालच्या दिशेने विंचरा.
7. योग्य आहाराचे सेवन करा : केस निरोगी ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.
हे लक्षात ठेवा
- पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा
- गाजर, अंडी, भोपळा आणि बेरीज यासारखे प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेळ असलेल्या अन्नाचे सेवन करा.
- ओमेगा 3 समृद्ध अन्न जसे की पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि फॅटी अॅसिड तुमच्या केसांच्या आरोग्यास चालना देतात.
- बदाम, काजू, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया केस तुटण्याची शक्यता कमी करतात आणि केसांची चमक वाढवतात.
- डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
