एक्स्प्लोर

Breakfast News : सकाळी-सकाळी तुमच्या रक्तातील साखर वाढते का? नाश्त्यात 'या' गोष्टी खाऊन बघा, चवही लागेल, आरामही मिळेल!

Health News : जर तुम्ही सकाळी योग्य गोष्टींचे सेवन केले तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी दिवसभर नियंत्रणात ठेवू शकते.

Health News : अनेकांना सकाळी भरपूर नाश्ता (Breakfast) करायची सवय असते, आरोग्याच्या (Health) दृष्टीने ते चांगले देखील आहे. मात्र तुम्ही सकाळी जे खात आहात त्यावरून तुमची दिवसभर तब्येत कशी असेल हे ठरते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात काय खावी हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचा रुग्ण जे काही खातो किंवा पितो त्यात साखरेचे प्रमाण थेट त्याच्या आरोग्यावर परिणाम करते. इतकंच नाही तर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडासा निष्काळजीपणाही अनेकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास भाग पाडतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्येही तुमच्या सकाळच्या नाश्त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्ही सकाळी योग्य गोष्टींचे सेवन केले तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी दिवसभर नियंत्रणात ठेवू शकते. आज आम्ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही आरोग्यदायी नाश्त्याचे पर्याय सांगत आहोत.

मसूर डाळ पोळा

आपण भारतीय लोक नाश्त्यात पोळा मोठ्या उत्साहाने खातात. त्याच वेळी, जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही नाश्त्यात मसूर डाळीचा पोळा खाऊ शकता. मसूराचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, ही डाळ फायबर आणि प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे मधुमेहात देखील फायदेशीर आहे.

शेवग्याच्या शेंगाचा पराठा

आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगा म्हणजेच ड्रमस्टिक सुमारे 300 रोगांवर गुणकारी असल्याचे सांगितले आहे. कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स त्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्याच वेळी, 'युरोपियन रिव्ह्यू फॉर मेडिकल अँड फार्माकोलॉजिकल सायन्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ड्रमस्टिकच्या पानांचा अर्क अल्फा ग्लुकोसिडेस आणि स्वादुपिंडातील अल्फा-अमायलेझ एन्झाईम्स रोखण्यासाठी प्रभावी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असते तेव्हा हे वाढते.


ड्रमस्टिकच्या पानांमध्ये आयसोथिओसायनेट नावाचे रासायनिक संयुग आढळते, जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त, या वनस्पतीच्या पानांमध्ये आढळणारे क्लोरोजेनिक ऍसिड देखील शरीरात साखरेवर प्रक्रिया करण्यास मदत करू शकते आणि इन्सुलिनवर देखील परिणाम करू शकते. अशा स्थितीत सकाळच्या वेळी शेवग्याच्या शेंगांच्या पानापासून तयार केलेला पराठा मधुमेहाच्या रुग्णांसाठी जीवनरक्षकापेक्षा कमी नाही.

पोहे

पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि लोह देखील मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. तुम्ही अनेक भाज्यांमध्ये मिसळून ते बनवू शकता. पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो आणि त्यात असलेले फायबर आणि प्रोटीनही तुमच्यासाठी फायदेशीर असतात.

ओट्स

ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकन हाय लेवल शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. विशेषत: जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये ते इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे रक्तामध्ये जास्त ग्लुकोज जमा होत नाही. याचा अर्थ असा की हा साधा दिसणारा नाश्ता मधुमेहासारख्या गंभीर आरोग्य स्थितीवर चांगला प्रभाव टाकू शकतो.

भाजलेला सुका मेवा

या सर्वांशिवाय तुम्ही भाजलेले बदाम, पिस्ता, अक्रोड आणि शेंगदाणे देखील नाश्तामध्ये समाविष्ट करू शकता. आहारात यांचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि आरोग्याला इतर अनेक प्रकारे फायदा होतो.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

Summer Hacks : उन्हाळ्यात दिसा 'स्टायलिश', गरमीत राहा 'कूल'! 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, मस्त आणि फ्रेश दिसाल

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Embed widget