(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Care Tips: नैराश्यापासून दूर राहायचंय? 'हे' पदार्थ खाणं टाळा
सध्या अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत.
Food Affects Mood : सध्या अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. वैयक्तिक जीवनातील ताण , कमाचा ताण किंवा नकारात्मक विचार ही कारणे नैराश्याची असू शकतात. काही पदार्थ खाल्यानंतर नैराश्य येऊ शकते. त्यामुळे आहारमध्ये हे पदार्थ खाणे टाळावे.
साखरेपासून तयार करण्यात आलेले पदार्थ
साखरेपासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्ल्यानंतर रक्ताच्या लेव्हलमध्ये बदल होऊ शकतात. तसेच या पदार्थांमध्ये तुमच्या एनर्जी लेव्हलवर देखील परिणाम होऊ शकतो. साखरेपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूड अनबॅलेन्स होऊ शकतो. त्यामुळे साखरेपासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणे टाळावे.
कॅफेन युक्त पेय
कॅफेनयुक्त पेय प्यायल्याने चिंता, तणाव आणि अनिद्रा या समस्या होऊ शकतात. कॅफेन आहारात जास्त प्रमाणात घेतले तर तुम्हाला नैराश्याच्या समस्या जाणवू शकतात. चॉकलेट, चहा आणि कॉफीमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असते.
मद्य पेय
मद्य पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने देखील नैराश्य येऊ शकते. अनेकांना आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे दारू प्यायची सवय लागते. दारू प्यायल्याने तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. दारू ही शरीरातील सेरोटोनिन आणि न्यूरोट्रांसमीटरच्या कार्याला बदलते. त्यामुळे नैराश्य येऊ शकते.
Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा
मीठाचे प्रमाण
आहारात मीठाचे प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला मूड स्विंग, तणाव आणि थकवा इत्यादी समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
अतिविचारामुळे तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येतेय का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )