Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा
अदिती राव हैदरीच्या सौंदर्याचं रहस्य म्हणजे, योगाभ्यास आणि डान्स असल्याचं तिनं सांगितलंय. बऱ्याचदा अदिती आपल्या फिटनेस रुटिनचे फोटो आपल्या सोशल मीडियावर उकाउंट्सवर शेअर करते.
![Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा Aditi Rao Hydari Fitness tips mantra how to take care of your health Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/27/92d192d0b02bcd54f0b71fe69cc4bc62_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aditi Rao Hydari Fitness : बॅालिवूड अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. मग ते त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल असो किंवा त्यांच्या फिटनेसबाबत. बॅालिवूड अभिनेत्री या आपल्या फिटनेसला जास्त प्राधान्य देताना दिसतात. अनेक अभिनेत्री जिम किंवा दररोजचं वर्कआऊट, योगा या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात. अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, जान्हवी कपूर यांच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री आपल्या फिटनेस रुटिनबाबत नेहमीच चर्चेत असते.
View this post on Instagram
अदिती राव हैदरीने आपले 2009 'दिल्ली 6' या चित्रपटातून आपले पदार्पण बॅालिवूडमध्ये केले. त्यानंतर रॅाकस्टार, फितूर, पद्मावत यासारख्या सुपरहिट चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले. मीडिया रिपोर्टनुसार, अदिती राव हैदरी ही खूप जास्त फिटनेस फ्रिक आहे. अदिती राव हैदरी फिट राहण्यासाठी योगाभ्यास आणि जिमचाही आधार घेते. अदिती जिममध्ये साधारण एक तीन-चार तास वर्काआऊट करण्यात घालवते. शिवाय लॅाकडाऊनच्या काळात देखील तिने आपले योगा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ती फिट राहण्यासाठी योगाभ्यास करते, त्याचबरोबर डान्ससुध्दा करते. तिचं असं म्हणणं आहे की, डान्स आणि योगा यामुळे आपण फिट राहतो. त्याच बरोबर एक अर्धा तास नेहमी वॅाक करणे हे तितकेच चांगले आहे.
View this post on Instagram
अदिती राव हैदरी ही एक शास्त्रीय डान्सरही आहे. डान्ससोबत योगा, जिम यासर्व डेलीच्या वर्काआऊटमुळे ती फिट आणि निरोगी राहते. त्यातच अदिती राव हैदरी ही फिन अन् फाईन राहण्यासाठी विशेष असं काही डायट फॉलो करत नाही. तर ती घरात तयार करण्यात आलेल्या जेवणाचा आधार घेते. अदिती तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळते. ती तिच्या रोजच्या आहारात सकाळी ज्यूस, अंडी आणि दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश करते. तर सकाळच्या जेवणात चपाती-भाजी, ब्राऊन राइस, डाळ तर रात्रीच्या जेवणात हलका आहार, सूप आणि राइस याचा समावेश करते. तिच्या मते, आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. तसेच ती चाहत्यांना फिट अन् फाईन राहण्यासाठी व्यायाम आणि नियमित योगा करण्याचाही सल्ला देते.
Birthday Special : ग्लॅमरस अदिती राव हैदरीचा नो मेकअप लूक असतो नेहमीच चर्चेत, पाहा फोटो
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)