India At 2047 : नव्या भारताचं नव्या ढंगातील रूप, जाणून घ्या अमृतमोहत्सवी भारताचा आतापर्यंतचा प्रवास
india at 2047 : देशाने स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षांचा इतिहास अतिशय संयमाने, लवचिकतेने, महत्त्वाकांक्षेने शानदार पद्धतीने लिहिला आहे.
India At 2047 : आजपासून 75 वर्षांपूर्वी भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे स्पप्न होते शांततापूर्ण, समृद्ध आणि प्रगतीशील भारत बनवणे. स्वातंत्र्याने केवळ मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा अधिकारच दिला नाही तर त्यासोबत शक्ती आणि जबाबदारीची जाणीव देखील करून दिली. विविधतेने नटलेल्या भारत भूमीने आपल्या भविष्याचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. या प्रवासात दिसणारी आणि न दिसणारी सर्व आव्हाने स्वीकारून देश पुढे आला आहे. 34 कोटींच्या तरुण देशाचे आज विविध जाती, धर्म, श्रद्धा आणि संस्कृती असलेल्या 138 कोटी लोकांच्या समृद्ध लोकशाही देशात रूपांतर झाले आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भाषण केले होते. हे भाषण ट्रस्ट विथ डेस्टिनी या नावाने प्रसिद्ध आहे. या भाषणात ते म्हणाले, "येणारे भविष्य हे विश्रांतीचे नाही, तर सतत प्रयत्नांचे आहे. आणि आमचा अखंड प्रयत्न आम्हाला हवा तसा राहिला नाही. या सातत्यपूर्ण प्रयत्नात आपण कधी पडलो, पुढे गेलो, तर कधी अडखळलो, पण आपण ते स्वप्न जिवंत ठेवले आणि प्रगतीचे क्षितिज विस्तारले. शतकानुशतके परकीय राजवट आणि लुटीनंतर तथाकथित "गरीब" तिसऱ्या जगातील देश म्हणून 75 वर्षांपूर्वी जी सुरुवात झाली, ती आता एक यशोगाथा आहे. एकेकाळी गुलामगिरीच्या साखळदंडात जखडलेल्या भारताची कहाणी आज जग प्रेरणेसाठी वाचते.
गरीब म्हणून पाहिले जाण्यापासून ते पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या आकांक्षेपर्यंत भारताने हे सर्व संयमाने केले. देशाने स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षांचा इतिहास अतिशय संयमाने, लवचिकतेने, महत्त्वाकांक्षेने शानदार पद्धतीने लिहिला आहे. अनेक युद्धे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थिरता, साथीचे रोग आणि आर्थिक आव्हानांचा आपण कुशलतेने सामना केला आहे. असे असूनही आज आपण सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती करू शकलो आहोत. यामध्ये शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, शेतीपासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत, समाजकल्याणापासून ते परराष्ट्र संबंधांपर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते परोपकारापर्यंत आणि मनोरंजनापासून ते खेळापर्यंतचे क्षेत्रांचा समावेश आहे. संकटात संधी शोधणे हेच आम्ही आमचे ध्येय बनवले आणि ते पूर्ण करून दाखवूनही दिले.
आज आपण देशाच्या भूतकाळातील वैभव आणि यशाचा आनंद लुटत आहोत. परंतु, सर्वात मोठी लोकशाही असल्याने वर्तमानावर लक्ष ठेवणे तसेच भविष्यासाठी योजना तयार करणे आपल्यासाठी आता खूप महत्वाचे आहे. आजपासून 25 वर्षांनंतर भारत 100 वर्षांचा झाल्यावर कुठे असेल? 2047 च्या भारतासाठी आपल्याकडे कोणती दृष्टी आहे? कोरोनासारख्या महामारीच्या प्रभावातून बाहेर पडताना आणि सर्वांगीण ग्रामीण आणि शहरी विकास सुनिश्चित करून समृद्धीची नवीन उंची गाठत विश्वगुरू आणि जागतिक महासत्ता बनण्याची आकांक्षा भारताने बाळगली आहे.
महत्वाच्या बातम्या
India At 2047 : नव्या जागतिक व्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी कसा तयार आहे?