IPL 2025 Shashank Singh PBKS vs GT: मैदानात उतरताच गोलंदाजांना धू धू धुतले; वडील आयपीएस अधिकारी, कोण आहे शशांक सिंह?
IPL 2025 Shashank Singh PBKS vs GT: सोशल मीडियावर पुन्हा एकदा शशांक सिंहच्या नावाची चर्चा रंगली आहे.

IPL 2025 Shashank Singh PBKS vs GT: आयपीएल 2025 च्या हंगामातील पाचवा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला. पंजाब किंग्जच्या 243 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त 232 धावा करू शकला.
पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. तर शशांक सिंहने (Shashank Singh) आक्रमक अशी 44 धावांची खेळी केली. 2024 च्या हंगामात देखील शशांकने अनेकदा पंजाबसाठी महत्वाची कामगिरी केली होती. आता पुन्हा शशांकने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा शशांक सिंहच्या नावाची चर्चा रंगली आहे.
The Curvv Super Striker of the Match between Gujarat Titans & Punjab Kings goes to Shashank Singh.
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
#TATAIPL | #GTvPBKS | #CurvvSuperStriker | @TataMotors_Cars pic.twitter.com/QDfMZLKnm4
कोण आहे शशांक सिंह?- (Who is Shashank Singh?)
शशांक सिंह हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 44.25 च्या सरासरीने 354 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे पंजाबने त्याला 2025 साठी 5.5 कोटी रुपयांत रिटेन केले होते. शशांकचा जन्म 21 नोव्हेंबर 1991 रोजी भिलाई, छत्तीसगड येथे झाला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडून खेळताना आपली छाप पाडली होती. आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससारख्या संघांकडून खेळण्याचा अनुभव घेतला, पण पंजाब किंग्समध्ये त्याला खरी ओळख मिळाली.
शशांक सिंहचे वडील आहेत आयपीएस अधिकारी- (Shashank Singh father is an IPS officer)
शशांक सिंहचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न त्याच्या वडिलांनीच पाहिले होते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की IPS होऊनही वडिलांनी आपल्या मुलाला शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न का पाहिले? शशांकने स्वतःच खुलासा केला होता की, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेट खेळावे. एका मुलाखतीमध्ये शशांक म्हणाला होता की, 'वडीलांचं स्वप्न होतं की मी क्रिकेटर व्हावं. लहानपणी वडील स्वतः गोलंदाजी करत माझा सराव घ्यायचे. त्यांनी मला घरी टर्फ पिच बनवून क्रिकेट खेळायला शिकवले, असं शशांकने सांगितले.





















