भारत-पाकिस्तान फाळणीनंतर देशाला ब्रटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
1947काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.
1947राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने गोळ्या झाडून हत्या केली होती.
1948राज्यघटना लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला.
1950स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली.
1951सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले.
1962भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर 9 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री भारताचे नवे पंतप्रधान बनले.
1964काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. जे संयुक्त राष्ट्रांनी युद्धविरामाच्या आवाहनानंतर थांबले.
19651965 च्या भारत-पाकिस्तान शांतता युद्धावर स्वाक्षरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये निधन झाले. यानंतर इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.
1966पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरे मोठे युद्ध झाले. जे बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर संपले.
1971भारताने पहिली यशस्वी अणुबॉम्ब चाचणी केली.
1974तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती. हजारो लोकांना तुरुगांत टाकण्यात आलं. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.
1975इंदिरा गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुका जिंकत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.
1980वेस्ट विंडिजचा पराभव करत भारताने एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं.
1983भारतीय हवाई दलाचे माजी पायलट आणि विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अवकाशात झेप घेतली होती. सोयुज टी 11 ला इंटेरकॉस्मोस प्रोग्राम अंतर्गत राकेश शर्मा यांनी अवकाशात झेप घेतली. अंतरीक्षाची यात्रा करणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते.
1984भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून ऑपरेशन ब्लू स्टार फत्ते केलं होतं. ‘दमदमी टकसाल’, जनरल सिंग भिंडरावाले आणि त्यांचे सहकारी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात तळ ठोकून होते. 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला. 1 जून ते 10 जूनपर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं.
1984भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच दोन शिख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या गेल्या.
1984मध्य प्रदेशातील भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधून मिथाईल आयसोसायनेट (MIC) या विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेनं 6500 लोकांचा मृत्यू झाला.
1984काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला. त्यामुळे पाकिस्तानसोबत तणाव वाढला.
1989आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली. निवडणूक प्रचारावेळी गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने तामिळ महिला त्यांच्या जवळ गेली होती. त्याचवेळी तिने कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला.
1991काँग्रेसनं सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा करण्यासाठी पावले उचलली. अनेक दशकांपासूनचे समाजवादी नियंत्रण मोडून काढले.
1991हजारो कारसेवकांनी आयोध्यामधील 16 शतकातील बाबरी मस्जिद पाडली. हे प्रभू रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी केला होता. या घटनेनंतर देशात सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली.
1992अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला.
1993अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपनं युतीचं सरकार स्थापन केलं.
1998भारताने पोखरण येथे दोन दिवसात एकूण पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर पाकिस्तानेही अणुचाचण्या केल्या.
1998पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर भारताने या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.
1999संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. नवी दिल्लीमधील संसदेवर पाकिस्तानी दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर वाहतूक आणि राजनैतिक संबंध तोडले गेले.
2001गुजरातच्या पंचमहलच्या गोधरा स्थानकात साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या एका डब्याला जमावाने आग लावली होती. या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
2002ट्रेन दुर्घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये दंगल घडली. यामध्ये 1000 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मुस्लिम लोकांचा समावेश अधिक होता.
2002काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्तास्थापन केली. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
2004मुंबईची लाईफलाईन लोकलमध्ये 11 मिनिटात सात बॉम्बस्फोटानं मुंबई हादरली. यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला.
2006समुद्राच्या मार्गे आलेल्या दहा दहशतावाद्यांनी मुंबईत हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईसह देश हादरला होता.
2008दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ‘बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्या’त (यूएपीए अॅक्ट) दुरुस्त्या करण्यात आल्या. यामुळे संघटना वा समूहांनाच नव्हे, तर व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करून तिची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार एनआयएला देण्यात आला.
2009भाजपनं युतीचं सरकार स्थापन केलं. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
2014मोदी सरकारने नोटाबंदी लागू केली. 500 आणि एक हजारांची नोट बंद करण्यात आली. 500 आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या.
2016ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात