VIDEO : सूरज चव्हाणचा हटके अंदाज; बॉलिवूड गाण्यावरील रिल्स व्हायरल; गड्याचा सोशल मीडियावर फुल्ल ऑन कल्ला
Suraj Chavan Reels Video : बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाला आहे. सूरज चव्हाण इंस्टाग्रामवर त्याचे नवनवीन व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.
Suraj Chavan Viral Video : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन तुफान गाजला. यामागचं एक मोठं कारण म्हणजे यंदाच्या पर्वातील सदस्य सूरज चव्हाण. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याला महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरुन प्रेम दिलं. अस्सल मातीतील साधा-सुधा माणूस म्हणून सूरजनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि अक्षरक्ष: महाराष्ट्राला वेड लावलं. त्याच्या साध्या, सरळ वागणं आणि माणुसकी यामुळे जनतेनं त्याला मोठ्या प्रमाणात व्होट करुन बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनवलं. सूरज चव्हाण आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.
सूरज चव्हाणचा हटके अंदाज
बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण सुरुवातील टिक टॉकमुळे व्हायरल झाला. सूरज चव्हाणच्या गावाकड्या कॉमेडी व्हिडीओंना खूप पसंती मिळाली, त्याचे डायलॉगही खूप फेमस झाले. त्यानंतर टिक टॉक बंद झाल्यावर त्याने इंस्टाग्रामवर रिल्स बनवायला सुरुवात केली. या रिल्सच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. यामुळेच त्याला बिग बॉस मराठी शोमध्ये जाण्याची संधी मिळाली.
बॉलिवूड गाण्यावरील रिल्स व्हायरल
View this post on Instagram
गड्याचा सोशल मीडियावर फुल्ल ऑन कल्ला
आता बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाला आहे. सूरज चव्हाण इंस्टाग्रामवर त्याचे नवनवीन व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. पण, यावेळी त्याचा अंदाज काहीसा वेगळा आहे. बिग बॉसमध्ये जाण्याआधी सूरजला कॉमेडी व्हिडीओंमुळे प्रसिद्धी मिळाली होती, पण आता तो बॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिजीत सावंतच्या गाण्यावरील व्हिडीओही चर्चेत
सूरज चव्हाणचा हा बदललेला अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. त्याच्या व्हिडीओंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस होत आहे. सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वी अभिजीत सावंतच्या 'मोहोबते लुटाऊंगा' या गाण्यावरही व्हिडीओ पोस्ट केला होता.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :