Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!
Hina Khan : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2022) आपला जलवा दाखवणार आहे.
![Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री! Cannes Film Festival 2022 TV actress hina khan launching her new film poster in cannes film festival Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/b80dd705ac1a46e2dc395b6d38fb0dcc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hina Khan : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2022) आपला जलवा दाखवणार आहे. हिना खान 2019 मध्येही कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. कोरोनामुळे, गेल्या दोन वर्षांपासून कान्स चित्रपट महोत्सव अतिशय थोडक्यात साजरा झाला. पण, यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान देखील तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टर लाँचसाठी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. हा एक इंडो इंग्लिश चित्रपट आहे. हिना या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.
याआधी हिना रेड कार्पेटवर झळकली आहे. इतर सेलिब्रिटींपेक्षा खूप वेगळ्या असलेल्या तिच्या लुकसाठी अभिनेत्रीचे कौतुक झाले आहे. सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व केल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्री हिना खानचे कौतुक केले होते.
यावेळी दीपिकाला भेटणार!
या आधी जेव्हा हिना खान या सोहळ्यात सामील झाली होती, तव्हा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या सोहळ्यात हजर होती. यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोण या सोहळ्यात सामील होणार आहे. दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये परीक्षकाची भूमिका निभवणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. यावरून दीपिका चांगलीच चर्चेत आहे. 16 ते 28 मे दरम्यान दीपिका यात व्यस्त असणार आहे.
फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहणार आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. तिच्यासोबत इराणी चित्रपट निर्माते असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस आणि अभिनेत्री पटकथा लेखक व निर्माती रेबेका हॉल यात सामील होतील.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Kitchen Kallakar : किचन कल्लाकारच्या किचनमध्ये पुन्हा होणार बच्चेकंपनीचा कल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)