Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
Deepika Padukone : लुई व्हिटनसाठी निवड झालेली दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय महिला आहे.
Deepika Padukone : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे (Louis Vuitton) लुई व्हिटन ब्रँड. दीपिका पदुकोण लुई व्हिटन या लक्झरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. लुई व्हिटनची ब्रँड अॅम्बेसेडर बनलेली दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय महिला आहे. याबद्दलची माहिती फ्रान्स कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रातून दिली आहे. त्यामुळे दीपिकाला सगळ्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लुई व्हिटॉनचे पोशाख आणि बॅग यांचे नियमित छायाचित्रण करण्यासोबतच, पदुकोणने यापूर्वी ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे.
2020 मध्ये, Lea Seydoux आणि Sophie Turner सारख्या स्टार्ससोबत मॉक व्हिंटेज बुक कव्हरसाठी पोझ देत, लेबलच्या मोहिमेत दिसणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री बनली. एम्मा स्टोन आणि चीनी अभिनेता झोउ डोंग्यू यांच्यासोबत दीपिका पदुकोण काम करणार आहे. तर झोउ डोंग्यू ही नावाजलेली चिनी अभिनेत्री आहे. तर दीपिका पदुकोणने 'पीकू', 'पद्मावत' आणि 'गहराइयां' सारख्या 30 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
दीपिकाला कान्स फेस्टिवलला ज्युरी सदस्य म्हणून नामांकित केलं गेलं आहे. दिपिकाच्या कामांना नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळत असते. 'छपाक' सिनेमाच्या माध्यमातून दिपिकाने एक सामाजिक विषयही मांडला होता. तिने हॉलीवू़ड सिनेमांमध्येही काम केले आहे.
लुई व्हिटन काय आहे?
लुई व्हिटन ही एक फ्रेंच फॅशन कंपनी आहे. ज्याला LV म्हणूनही ओळखलं जाते. या फॅशन कंपनीची स्थापना १८५४ ला झाली होती. ही कंपनी आपल्या लक्झरी आणि चामड्यांच्या वस्तूंसाठी प्रसिध्द आहे. लुई व्हिटन ही कंपनी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनींमधली एक कंपनी आहे.
यंदाच्या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करत दीपिकाने चाहत्यांना माहिती दिली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल हे या वर्षी 17 मे ते 28 मे या दरम्यान संपन्न होणार आहे.
संबंधित बातम्या