एक्स्प्लोर

Hollywood: हिटलर, ज्यू हत्याकांड, मोसादच्या जगभरातील उचापतीच्या भन्नाट कथा... प्रत्येकाने पाहावेत असे पाच हॉलिवूडपट

Steven Spielberg Movies: हिटलर आणि इस्त्रायलची गुप्तचर संघटना मोसाद तसेच दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित पाच चित्रपट असे आहेत जे तुम्ही पाहिलेच पाहिजेत. 

Hollywood Movie: हिटलर (Hitler) म्हटलं की डोळ्यासमोर येते ती लष्करी गणवेशतील एक करारी प्रतिमा, ती विशिष्ट मिशिंची स्टाईल आणि हाताच्या दंडावर असणारे ते लाल रंगातील स्वस्तिक चिन्ह. ही झाली एक बाजू, पण याच क्रूरकर्माने लाखो ज्यूंची हत्याही केलीय, जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. या कथानकांवर अनेक चित्रपट आलेत. त्याचवेळी सर्वाधिक चर्चेत असते ती इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद. या एवढ्याशा देशाच्या एवढ्याशा संघटनेनं जगभर अनेक उचापती केल्यात. त्याच्या अनेक सुरस कथाही ऐकायला, पाहायला मिळतात.

ज्याला हिटलर, त्याने केलेला ज्यूंचा छळ, इस्रायल, मोसाद, दुसरं महायुद्ध या घटनांशी संबंधित काही पाहण्यात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी काही खास चित्रपट आहेत. काही काल्पनिक तर काही तत्कालीन वास्तवाचं भान देणारे.

Jojo Rabbit: जोजो रॅबिट

हा चित्रपट निव्वळ अप्रतिम आहे. एक भारी विषय कॉमेडीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलाय. स्कारलेट जॉन्सनच्या (Scarlett Johansson) मस्त अभिनयाची जोड आहेच. 

लहान मुलांच्या मनावर एखाद्या धर्माबद्दल किंवा जातीबद्दल निर्माण केलेला तिरस्कार त्यांच्या मनात आयुष्यभर राहतो. सगळ्या फॅसिस्ट शक्तींचा हाच प्रयत्न असतो. असाच ज्यू धर्मियांच्याबद्दलचा तिरस्कार 10 वर्षांच्या जोजोच्या मनात असतो, त्याच्यावर हिटलरच्या विचारधारेचा जबरदस्त प्रभाव असतो. पण त्याची आई त्याला सांगते, प्रेम हेच जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

या जोजोचा एक काल्पनिक मित्र असतो... हिटलर...जो त्याला नेहमी गाईड करत असतो. या जोजोच्या आईने त्याच्या घरी एका ज्यू मुलीला लपवून ठेवलं असतं.... मग काय करतो जोजो, हिटलर त्याची कशी मदत करतो... हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा. 2020 च्या ऑस्करमध्ये (Oscar) बेस्ट रायटिंग या विशेष कॅटेगरीत जोजो रॅबिटला पुरस्कार मिळाला.

स्वातंत्र्याची नेमकी किंमत काय असते हे हा चित्रपट पाहिल्यावर कळेल. हा चित्रपट तुम्हाला अमेझॉन प्राईमवर ( Amazon Prime Video ) पाहायला मिळेल.

Munich: म्युनिक

1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये (1972 Munich Olympic) इस्रायलच्या (Israel) आख्या टीमला पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यानी मारलं. या घटनेचे मास्टरमाईंड जगभर लपलेले असतात, त्यांना कसं शोधलं जात.  मग त्याचा बदला इस्त्रायलचं गुप्तचर खातं मोसादने कसा घेतलाय हे यातून दाखवलं आहे. 

चित्रपट स्टीव्हन स्पीलबर्गचा (Steven Spielberg) आहे, मग तर विषयच नाही. हा चित्रपट पहिल्यानंतर तुम्हाला मोसादविषयी (Mossad) कुतूहल आणि आकर्षण नक्कीच वाटेल. तुम्हाला मोसादविषयी काहीच माहित नसेल तर हा चित्रपट पाहाच, मग मोसादच्या प्रेमात पडाल आणि त्याविषयी अधिक माहिती घ्याल. हा चित्रपट तुम्हाला अमेझॉन प्राईमवर ( Amazon Prime Video ) पाहायला मिळेल. 

Operation Finale: ऑपरेशन फिनाले...

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने अनेक ज्यूंचे हत्याकांड घडवून आणलं होतं. या ज्यूंना जर्मनीभरातून गोळा केलं जायचं आणि त्यांना गॅस चेंबरमध्ये घालून, विषारी वायूने मारलं जायचं. हिटलरने ही कामगिरी अडोल्फ आईकमन (Adolf Eichmann) या नाझी अधिकाऱ्याकडे सोपवली होती, आणि त्याने ती इमानेइतबार पार पाडली होती. त्याने तब्बल 60 लाख ज्यूंची हत्या केली. हिटलरचा पराभव झाल्यावर हा आईकमन दोस्त राष्ट्राच्या हातून निसटतो. ज्यूंच्या नरसंहाराबद्दल इस्रायल याच्या शोधात असते आणि तब्बल 10 वर्षांनी तो अर्जेंटिनामध्ये राहत असल्याचा सुगावा मोसादला लागतो  मग मोसादने त्याला अर्जेंटीनावरुन कसा उचलला, त्यांना काय काय उचापती कराव्या लागल्या याची सुरस कथा चित्रित करण्यात आली आहे. हा चित्रपट एकंदरीत बेस्ट आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर ( Netflix ) पाहायला मिळेल.

Inglourious Bastererds: इनग्लोरियस बास्टर्ड्स

ही कथा आहे दुसऱ्या महायुद्धच्या दरम्यानची. हिटलरच्या सैन्याचा अन्वयित अत्याचार सुरू असताना त्याच्या विरोधात एक टीम उभी राहते, त्याची ओळख बास्टर्ड्स अशीच आहे. ते चक्क हिटलरलाच मारायचं प्लॅनिंग करतात... त्यांच्या या कामात त्यांना एक ज्यू मुलगी साथ देते.. ती मुलगी लहान असताना तिच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घातलेल्या असतात, आणि ती कशीतरी वाचलेली असते.

ब्रॅड पिट (Brad Pitt) आहेच.... पण ख्रिस्तोफर वॉल्टझच्या (Christoph Waltz) भन्नाट अभिनयाच्या प्रेमात पडाल... ज्यू हत्याकांडासाठी कारणीभूत आईकमन आठवेल याच्याकडे पाहिल्यावर.... कथा काल्पनिक आहे, पण भन्नाट आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर ( Netflix ) पाहायला मिळेल.

Schindler's List: शिंडलर्स लिस्ट....

ही कथादेखील दुसऱ्या महायुद्धच्या दरम्यानची आहे. शिंडलर एक जर्मन उद्योगपती असतो, ज्याचं हिटलरच्या दरबारात मोठं वजन असतं. हिटलरचे अनेक लष्करी अधिकारी त्याला दबकून असायचे, त्याचा नेमका फायदा घेत त्याने अनेक ज्यू लोकांना वाचवलं. शिंडलरने ज्या ज्यू लोकांना त्यावेळी वाचवलं आहे त्या लोकांचा आता वेगळा सेक्ट आहे, त्यांना शिंडलर्स ज्यू म्हटलं जातं. हा चित्रपट स्टीव्हन स्पीलबर्गचा (Steven Spielberg) असल्यानं अप्रतिमच आहे. हॉलिवूडच्या आतापर्यंतच्या बेस्ट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट वरच्या क्रमांकावर येतो. काहीतरी भन्नाट पाहायचं असेल तर हा चित्रपट बघाच.

हे चित्रपट पहिल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी क्लिअर होतील. महत्वाचं म्हणजे दुसरं महायुद्ध असो वा मोसाद... याविषयी अधिक माहिती घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल. तर मग हे टॉप फाईव्ह हॉलिवूडपट नक्की पाहा. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर ( Netflix ) पाहायला मिळेल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget