एक्स्प्लोर

Telly Masala : छोट्या पडद्यावरील राम-सीता सांगणार वीर मुरारबाजींचा पराक्रम ते सासूच्या निधनाने धक्का, चित्रपट निर्मात्याने उचलले टोकाचे पाऊल; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Arun Govil and Dipika Chikhlia :  छोट्या पडद्यावरील राम-सीता सांगणार वीर मुरारबाजींचा पराक्रम;अरुण गोविल-दीपिका चिखलीया मराठी चित्रपटात

Arun Govil and Dipika Chikhlia :  छोट्या पडद्यावरील 'रामायण'  (Ramayan) या मालिकेने लोकांच्या मनावर केलेले गारुड आजही कायम आहे. सुमारे  30-35 वर्षांपूर्वी प्रसारीत झालेल्या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता कायम आहे. प्रभू श्रीराम आणि सीता माता या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या 'राम-सीते'च्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मुरारबाजी यांच्यावरील चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Chinmay Mandlekar : 'मतदार लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात', चिन्मय मांडलेकरनं स्पष्टचं म्हटलं


Chinmay Mandlekar on Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यातच अनेक कलाकार मंडळी देखील यंदाच्या लोकसभेच्या मैदानात उतरली आहे. पण या सगळ्यात मतदार म्हणून कलाकार मंडळींना काय वाटतं याची देखील अनेकांना उत्सुकता असते. नुकतच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या राजकीय भूमिकेचा देखील यावेळी खुलासा केला असल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Hema Malini : आडवाणींच्या 'रथयात्रे'ने हेमा मालिनीचा चित्रपट डब्यात घातला! 'ड्रीम गर्ल'ने वाईट ठरवलेला चित्रपट कोणता?


Hema Malini :  अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास बॉलिवूडमध्येही सुरू राहिला. हेमा मालिनी यांनी नायिकेच्या भूमिकेसह खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. भले त्यांनी खलनायकी भूमिका दमदारपणे साकारली असेल, पण प्रेक्षकांनी त्यांना नायिकेच्या भूमिकेत पाहणे पसंत केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Salman Khan : 2900 कोटींची संपत्ती, ना आलिशान फ्लॅट अन् बंगला; गॅलेक्सी अपार्टमेंटच्या वन BHK मध्ये का राहतो सलमान?

Salman Khan :  सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट चांगलंच चर्चेत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) राहतो. समुद्र किनाऱ्यासमोर असणाऱ्या या अपार्टमेंटच्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना भेटत असतो. रविवारी, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या गॅलरीच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये ज्याच्या शब्दाचा मान, आदरयुक्त भीती आहे, ज्याची संपत्ती जवळपास 2900 कोटींच्या घरात आहे, तो सलमान खान वांद्रे येथील वन बीएचके फ्लॅटमध्ये का राहतो असा अनेकांना प्रश्न पडला असेल. त्याचे कारणही सलमानने एकदा सांगितले होते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Producer Soundarya Jagadish Found Dies : सासूच्या निधनाने धक्का, चित्रपट निर्मात्याने उचलले टोकाचे पाऊल; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा, पोलिसांकडून तपास सुरू

Producer Soundarya Jagadish Found Dies : आपल्या सासूच्या निधनाने प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या चित्रपट निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कन्नड चित्रपट निर्माता आणि उद्योगपती सौंदर्या जगदीश यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. सौंदर्या जगदीश हे निर्माते आणि व्यावसायिक होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Salman Khan Mumbai Police : सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक कोणाची? मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर...


Salman Khan Mumbai Police :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासात मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर आरोपींनी सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक ही रायगडमधील असल्याची माहिती आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Embed widget