एक्स्प्लोर

BCCI on Shama Mohamed : रोहित शर्माला जाड्या म्हणणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदला बीसीसीआयच्या सचिवांनी झापलं, म्हणाले...

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधारावर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे

BCCI on Shama Mohamed fat-shames Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाचे खेळाडू आता सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याची तयारी करत आहेत. पण दरम्यान, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधारावर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. रोहितच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शमा मोहम्मद यांनी ते ट्विट डिलीट केले. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्मावरील शमाच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला आहे.

माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले,  आमच्या कर्णधारासाठी (भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा) अशा प्रकारची टिप्पणी एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून करण्यात आली आहे, हे खूप दुर्दैवी आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचली असताना, असं वक्तव्य दुर्दैवी आहे. 

काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद काय म्हणाल्या होत्या? 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रोहित शर्मा जाड्या खेळाडू, वजन कमी करण्याची गरज आहे. आणि तो आतापर्यंतचा सर्वात छाप न सोडणारा भारताचा कप्तान आहे.

शमाच्या या विधानामुळे राजकारणही तापले आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानावर भाजपने काँग्रेसला घेरले आहे आणि त्यावर जोरदार टीका केली आहे. पण, शमाने तिच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे की तिने कोणाचाही अपमान केलेला नाही. फक्त असं म्हटलं जातं की कर्णधार म्हणून रोहितचा फारसा प्रभाव नाही.

रोहित शर्मा यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत कधीही ग्रुप-स्टेज सामना हरला नाही. कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताचे नेतृत्व केले आणि 2024 मध्ये त्याने भारताला दुसरे टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिले. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

हे ही वाचा -

Glenn Phillips Virat Kohli : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने घेतला अफलातून झेल, अनुष्का शर्मा निराश; विराट कोहलीने सामना संपल्यावर काय केलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan T20 World Cup 2026 : शाहिद आफ्रिदी भडकला! स्वतःच्याच जावयाला नको नको ते बोलले, शेवटी पाकिस्तान क्रिकेटचा मोठा निर्णय, टीममधूनचं काढलं
शाहिद आफ्रिदी भडकला! स्वतःच्याच जावयाला नको नको ते बोलले, शेवटी पाकिस्तान क्रिकेटचा मोठा निर्णय, टीममधूनचं काढलं
ICC Tournaments Venue Shift : कंगाल पाकिस्तानच्या कुरापतींमुळे टीम इंडियाला मोठा झटका! वर्ल्ड कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी भारताबाहेर शिफ्ट होणार?, जय शाह घेणार मोठा निर्णय
कंगाल पाकिस्तानच्या कुरापतींमुळे टीम इंडियाला मोठा झटका! वर्ल्ड कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी भारताबाहेर शिफ्ट होणार?, जय शाह घेणार मोठा निर्णय
J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
Mohammed Shami News : शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं
शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
Embed widget