'चंद्रा' झाली 'चिऊताई'! आयटम साँगमध्ये दिसणार ग्लॅमरस अमृता खानविलकर; सुशीला-सुजित चित्रपटात ठसकेबाज डान्सचा डोस!
Sushila Sujeet Movie : अमृता खानविलकर सुशीला-सुजित या चित्रपटात चक्क आयटम साँग करताना दिसणार आहे. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.

Sushila Sujeet Marathi Movie : कायम चर्चेत असलेली अमृता खानविलकर पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अमृता तिच्या मित्र मंडळीच्या सिनेमांत एक खास गाणं केलं आहे. या 'चिऊताई चिऊताई दर उघड' असं या गण्याचं नाव आहे. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमवल्यानंतर या प्रवासात तिने पहिल्यांदाच आइटम साँग केलं आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री अमृता या आयटम साँगमध्ये आता ठसकेबाज डान्स करताना दिसणार आहे.
अमृता खानविलकर आयटम साँगमध्ये दिसणार
अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. तिचं याआधी चंद्रा हे गाणं फारच गाजलं. आजही या गाण्यावर अनेक तरुणी थिरकताना दिसतात. या गाण्यात नृत्याच्या मदतीने तिने केलेली कमाल मोजक्याच अभिनेत्रींना जमलेली आहे. अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता 'सुशीला सुजीत' या चित्रपटात पहिल्यांदाच आइटम साँग करताना दिसणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अमृताचा नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे.
गाणं यूट्यूबवर रिलीज
विशेष म्हणजे सुशीला- सुजीत या चित्रपटातील चिऊताई चिऊताई दार उघड हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. पॅनोरमा म्यूझिक या यूट्यूब चॅनेलवर हे गाणे तुम्हाला पाहता येईल. या गाण्यातील तिचा नवा लूक आणि नवं नाव प्रेक्षकांना भुरळ पाडणारं आहे. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं आहे. आता अमृता या नव्या आइटम साँगमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनावर राज्य करण्यासाठी आली आहे.
18 एप्रिल रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
या गाण्यात गश्मीर महाजनी हादेखील दिसतोय. विशेष म्हणजे या गाण्यात अमृता खानविलकरसोबत गश्मीर हादेखील थिरकताना दिसतोय. त्यामुळे हे आयटम साँग महाराष्ट्रभर प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुशीला-सुजीत हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
प्रसाद ओकचे दिग्दर्शन
या चित्रपटात स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, सुनिल तावडे, रेणुका दफ्तरतार असे दिग्गज कलाकार असणार आहेत. तर प्रसाद ओक यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केलंय.
हेही वाचा :
Samantha Ruth Prabhu: समंथाने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 15 वर्षे, तिचे फोटो पाहून यूजर्स म्हणाले..
Maliaka Arora: बॉलीवूडच्या मुन्नीचा बोल्ड अंदाज; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!























