एक्स्प्लोर

Producer Soundarya Jagadish Found Dies : सासूच्या निधनाने धक्का, चित्रपट निर्मात्याने उचलले टोकाचे पाऊल; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा, पोलिसांकडून तपास सुरू

Producer Soundarya Jagadish Found Dies : निर्माते सौंदर्या जगदीश हे मागील काही दिवसांपासून तणावात होते. अखेर रविवारी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Producer Soundarya Jagadish Found Dies : आपल्या सासूच्या निधनाने प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या चित्रपट निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कन्नड चित्रपट निर्माता आणि उद्योगपती सौंदर्या जगदीश यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. सौंदर्या जगदीश हे निर्माते आणि व्यावसायिक होते. 

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास बेंगळुरू येथील महालक्ष्मी लेआउट येथील निवासस्थानी सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे? त्यामागील नेमकं कारण काय? अशा वेगवेगळ्या अँगलने पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. 

जगदीश यांचा जवळचा मित्र श्रेयस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जगदीशचा मृत्यू झाला आहे. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखले केले. मात्र, त्याला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. जगदीश याला  आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नव्हत्या. या क्षणी तरी आम्ही नेमंक कारण सांगू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

बँकेच्या नोटीसमुळे सौंदर्या जगदीश यांचा टोकाचा निर्णय?

जगदीश यांना नुकतीच बँकेने नोटीस पाठवली होती. या नोटीसमुळे त्यांनी आत्महत्या केली का, असे विचारले असता त्यांच्या मित्राने नकारार्थी उत्तर दिले. नोटीसचा आणि आत्महत्येचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी म्हटले. व्यवसायाशी संबंधित प्रश्न वेगळे आहेत. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आल्याचे श्रेयसने सांगितले. निर्माते सौंदर्य जगदीश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करणारे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले.

सासूच्या निधनाने मानसिक धक्का

रविवारी, 14 एप्रिल रोजी जगदीश यांनी सकाळच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब समजताच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 'इंडियन एक्स्प्रेस'ने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, जगदीश यांच्या पत्नीने याबाबत एक तक्रार नोंदवली होती.

नुकतेच काही दिवसांपूर्वी जगदीश यांच्या सासूचे निधन झाले होते.  जगदीश आणि त्यांच्या सासूमध्ये चांगले भावनिक बंध जुळले होते. मात्र, त्यांच्या निधनाने जगदीश खचले आणि मानसिक तणावात गेले. काही दिवसांपासून जगदीश हे ताण-तणावावर औषधेदेखील घेत होते. 

वादात अडकला होता पब

सौंदर्या जगदीश हे एका पबचे मालक होते. ते चित्रपट निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक होते. त्याशिवाय त्यांचे इतरही व्यवसाय होते. वृत्तानुसार, काही चित्रपट कलाकार आणि क्रू हे पबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा पब अलीकडेच वादात सापडला होता. त्यामुळे त्यांच्या पबचा परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला होता. याची चिंताही त्यांना सतावत होती. 

श्रीकांत भोसले
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
Nora Fatehi Song Trolling: नोरा फतेही संजय दत्तच्या नव्या गाण्याने ओलांडल्या अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा, सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलिंग
नोरा फतेही संजय दत्तच्या नव्या गाण्याने ओलांडल्या अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा, सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोलिंग
'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Embed widget