Santosh Juvekar on Chhaava Movie: मुघलांची भूमिका साकारणाऱ्या कुणाशीच बोललो नाही, अक्षय खन्नाकडे तर पाहिलंही नाही, इच्छाच झाली नाही; संतोष जुवेकरनं का केलं असं?
Santosh Juvekar on Chhaava Movie: संतोष जुवेकरनं आता 'छावा'च्या शुटिंगदरम्यान घडलेल्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. मी शुटिंगदरम्यान मुघलांची भूमिका साकारणाऱ्या कोणाशीच बोलले नाही.

Santosh Juvekar on Chhaava Movie Aurangzeb Akshaye Khanna: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) फक्त दमदार ओपनिंगच केली नाही, तर बॉक्स ऑफिसवर (Box Office) ताबाही मिळवला. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शिक 'छावा' चित्रपटात अनेक मराठमोळे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. यापैकी एक नाव म्हणजे, अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar). सिनेमात छत्रपती शंभूराजेंसाठी जीव देण्यासाठीही तयार असणाऱ्या 'रायाजीं'ची भूमिका मराठी अभिनेता संतोष जुवेकरने साकारली. अखेरच्या क्षणीही रायाजी महाराजांना मुजरा करुनच प्राण सोडतो, असं दृश्य या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सीनमुळे संतोषचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण, संतोष जुवेकरनं आता 'छावा'च्या शुटिंगदरम्यान घडलेल्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
न्यूज 18 लोकमतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरनं सिनेमाच्या चित्रिकरणावेळीच्या एका गोष्टीचा खुलासा केला. संतोष जुवेकरनं म्हटलं की, "आम्ही जेजे मुघल होते, जेजे मुघलांची पात्र करत होते... ते कलाकारच आहेत, पण माहीत नाही... मी त्यांच्याशी नाही बोललो. संपूर्ण सिनेमाभर मुघलांमधल्या कोणत्याही पात्राशी मी बोललो नाही. मी एका शुटिंगला गेलो होतो, सरांना भेटायला... अक्षय खन्नाचं औरंगजेबाचं एका सीनचं शूट सुरू होतं. मी सरांना भेटलो आणि तिकडे बाजूला अक्षय खन्ना बसला होता. मी सरांना भेटलो आणि म्हटलं सर मी निघतो. तिकडे त्यांचे असिस्टंट होते, ते म्हणाले, अरे अक्षय खन्ना आहेत इथे... मी तिकडे बघितलंही नाही. मी बघूच शकत नाही."
"माझा काही अक्षय खन्नावर राग नाही... उत्तम काम केलंय त्या माणसानं, पण नाही... मला नाही बोलावसं वाटलं त्यांच्याशी, मी सेटवरही नव्हतो बोलत कोणत्याही मुघलाशी. म्हणजे, त्यातला एखादा मुघल शुटिंगनंतर मेकअप काढून जरी आलो ना, अरे काय भाई चलो चलते है म्हणालं... मी फक्त हा म्हणून सोडून द्यायचो... माझ्याकडून होतच नव्हतं...", असं संतोष जुवेकर म्हणाला. पुढे बोलताना संतोष जुवेकर म्हणाला की, "आमच्यात बॉडिंग होतं. जे आम्ही अष्टक होतं, त्यांच्यात बॉडिंग होतं."
दरम्यान, 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, रायाजीची भूमिका संतोष जुवेकरनं साकारली आहे. राजायी म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाईंच्या निधनानंतर ज्या धाराऊनं त्यांना दूध पाजलं, तिचा मुलगा. पुढे तो शंभू राजांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा मित्र झाला. सिनेमाच्या पडद्यावर जसं शंभू राजे आणि रायाजीचं नातं होतं. तसंच, नातं विक्की कौशल आणि संतोष जुवेकरचं होतं, असं अभिनेत्यानं स्वतः एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























