IIT Baba News : मोठी बातमी : IIT बाबाकडे गांजा सापडला, पोलिसांनी लगोलग उचललं, कोणत्या राज्यात कारवाई?
सोशल मीडियावर 'आयआयटी बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे.

Case against viral IIT Baba : महाकुंभमेळ्यादरम्यान प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा अभय सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.'आयआयटी बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे. जयपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई ही केली. वृत्तानुसार, बाबाने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता की, मी आत्महत्या करेल. अशा परिस्थितीत, शिप्रा पथ पोलिस ठाण्याने स्वतःहून दखल घेतली आणि शहरातील क्लासिक हॉटेलमधून बाबाला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने त्याच्याकडून गांजाही जप्त केला. अशा परिस्थितीत त्याच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयआयटी बाबाने शेअर केला व्हिडीओ
दरम्यान, आयआयटी बाबाने पोलीस रुममध्ये तपासणी करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या दोन तासांपासून तपासणी सुरु असून, पोलीस मला व्हिडीओही काढू देत नव्हते, असा आरोप त्याने केला. तो म्हणाला की, मी रात्रभर झोपलो नाही. मला नको तुमचं सनातन, मी दुसऱ्या देशात जाऊनही सनातन करु शकतो. आपले ज्ञानी लोक तुमच्याकडे ठेवा. पोलीस आज माझा वाढदिवस साजरा करत आहे.
View this post on Instagram
आयआयटी बाबा महाकुंभामुळे प्रसिद्धीच्या झोतात!
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महाकुंभ गेल्या महिन्यातच संपला. पण महाकुंभामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभय अजूनही कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत केलेल्या भाकितामुळे चर्चेत आला होता. तो म्हणाला होता की, भारत सामना हरेल. पण, भारताने तो सामना जिंकला. यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले.
गेल्या शनिवारी, एका लाईव्ह शो दरम्यान झालेल्या वादामुळे तो चर्चेत आला होता. शुक्रवारी नोएडा येथे एका खाजगी वाहिनीवरील वादविवाद कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप अभय सिंग यांनी केला होता. त्याने पोलिसांकडे तक्रार केली की, काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांनी त्याच्याशी गैरवर्तन केले आणि काठ्यांनी मारहाण केली.
हे ही वाचा -





















