Bahubali : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने नाकारला होता ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपट, दुसऱ्या नायिकेनं केलं संधीचं सोनं, रातोरात बनली स्टार
Female Superstar Rejected SS Rajamouli Movie : एसएस राजामौलीचा ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपट बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीने नाकारला होता.
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक नाव म्हणजे एसएस राजामौली. एसएस राजामौली यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरून सारख्या हॉलिवूड दिग्गजांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. पण, एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीने राजामौलींच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजामौली यांनी त्या भूमिकेसाठी एका दुसऱ्या अभिनेत्री निवडलं, जी त्याचं भूमिकेमुळे मोठी स्टार बनली.
अभिनेत्रीने नाकारला होता बाहुबली चित्रपट
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड दक्षिणात्या चित्रपटांपेक्षा मानला जात होता, पण एसएस राजामौली यांनी त्यांच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांची दक्षिणात्या चित्रपटांबद्दलची धारणा बदलली. आज फक्त भारतातच नाही तर जगभरात एसएस राजामौली यांच्या चित्रपटांची चर्चा असते. स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरून यांसारख्या हॉलिवूड दिग्दर्शकांनीही राजामौली यांच्या चित्रपट निर्मितीचे कौतुक केलं आहे.
होकार देणारी दुसरी नायिका रातोरात बनली स्टार
आज अनेक कलाकार आहेत जे एसएस राजामौली यांच्या चित्रपटात केवळ दोन मिनिटांच्या भूमिकेसाठी आसुसलेले आहेत, पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टार अभिनेत्रीने राजामौलीचा चित्रपट नाकारला होता. याचं कारण चित्रपट निर्माते तिच्या मागणीनुसार फी देण्यास तयार नव्हते, असं सांगण्यात येतं. ही बॉलिवूड सुपरस्टार म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहे. श्रीदेवीने जवळपास अडीच दशके हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली.
सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्रीचा बाहुबलीसाठी नकार
'बाहुबली' चित्रपटामधील शिवगामीच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा श्रीदेवीला विचारणा करण्यात आली होती, पण तिने या भूमिकेसाठी आठ कोटी रुपये मानधन मागितल्याचं सांगितलं जातं. न्यूज18 तेलुगूच्या रिपोर्टनुसार, श्रीदेवीचे हॉटेल आणि फ्लाइटचा खर्च यामुळे निर्मात्यांवर एकूण सुमारे 15 कोटी रुपयांचा बोजा होता. त्यामुळे दिग्दर्शक यासाठी तयार नव्हते. यानंतर त्यांनी श्रीदेवीऐवजी राम्या कृष्णनला शिवगामीच्या भूमिकेत कास्ट केलं.
हे होतं कारण
'बाहुबली' हा एक बिग बजेट चित्रपट होता. चित्रपटाचं बजेट आधीच खूप जास्त होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बाहुबली: द बिगिनिंग' चित्रपट बनवण्यासाठी 136 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने जवळपास 600 कोटींची कमाई केली होती. बाहुबली चित्रपटाच्या रिलीजनंतर एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, श्रीदेवीने ही भूमिका स्वीकारली नाही हे खूप चांगलं झालं.
यानंतर श्रीदेवीनेही एका मुलाखतीत यावर उत्तर दिलं होतं. श्रीदेवी म्हणाली होती की, फीमुळे बाहुबली चित्रपट नाकारला ही बाब खरी नाही. जर तिने असा विचार केला असता तर, तिने 300 चित्रपटांमध्ये काम केलं नसतं. 'बाहुबली' चित्रपटा श्रीदेवीच्या हातातून निसटला, पण राम्या कृष्णनने शिवगामीची भूमिका इतकी छान साकारली आहे की, त्या भूमिकेत तिच्याऐवजी इतर कोणत्या अभिनेत्रीची कल्पनाही करता येणार नाही. शिवगामीच्या भूमिकेमुळे राम्या कृष्णन रातोरात स्टार बनली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :