Shah Rukh Khan : शाहरुखने रचला इतिहास! वर्षभरात केली 2500 कोटींची कमाई; किंग खान लवकरच करणार तीन सिनेमांची घोषणा
Shah Rukh Khan : शाहरुख खानने भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचला असून त्याचे आणखी तीन सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत.
![Shah Rukh Khan : शाहरुखने रचला इतिहास! वर्षभरात केली 2500 कोटींची कमाई; किंग खान लवकरच करणार तीन सिनेमांची घोषणा Shah Rukh Khan Announce Three Upcoming Movies 2024 After Dunki bollywood actor to cross mark 2500 crore rupees in a Year Know Bollywood Entertainment Latest Update Shah Rukh Khan : शाहरुखने रचला इतिहास! वर्षभरात केली 2500 कोटींची कमाई; किंग खान लवकरच करणार तीन सिनेमांची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/02/d59eaae187e85199c84753762d10fa181704186722948254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. शाहरुखने 2023 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचला असून त्याचे आणखी तीन सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत.
शाहरुख खानचे 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे ब्लॉकबस्टर तीन सिनेमे 2023 मध्ये रिलीज झाले. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 2500 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन जमवलं आहे. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 'जवान'ने 1100 कोटी आणि 'डंकी'ने 300 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
शाहरुख करणार तीन सिनेमांची घोषणा?
शाहरुख खान सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पण लवकरच तो आगामी सिनेमांची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग खान लवकरच तीन बिग बजेट सिनेमांची घोषणा करू शकतो. या सिनेमांची निवड किंग खानने खूप विचार करुन केली आहे.
शाहरुख खान एप्रिल किंवा मे महिन्यात त्याच्या आगामी सिनेमांची घोषणा करू शकतो. या सिनेमात तो लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan) स्क्रीन शेअर करेल. सुहानाने 2023 मध्ये 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
करण जोहर अन् शाहरुख 14 वर्षांनी एकत्र काम करणार
करण जोहर आणि शाहरुख खान 14 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखला सध्या अॅक्शन सिनेमा करायचा नाही. त्यामुळे आता करण जोहर आणि शाहरुख खान कोणत्या सिनेमात एकत्र काम करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'धूम 4'मध्ये झळकणार शाहरुख?
शाहरुख खानने अद्याप त्याच्या आगामी सिनेमाबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण अभिनेत्याचं नाव आता 'धूम 4'सोबत जोडलं जात आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांना आता सुखद धक्का बसला आहे. 'धूम 4'साठी शाहरुखच योग्य असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 'धूम 4' या सिनेमात किंग खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या यशराज फिल्म्स (YRF) अभिनेत्यासोबत या सिनेमासंदर्भात बोलणी करत आहे. निर्माते लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील.
संबंधित बातम्या
Suhana Khan Agastya Nanda : शाहरुखची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट? 'द आर्चीज' स्टार मिहिर आहूजाने सोडलं मौन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)