Sara Ali Khan : जय भोलेनाथ! अयोध्येतील राम मंदिरात न जाता सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला; नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Sara Ali Khan : अयोध्येतील राम मंदिरात न जाता घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गेल्याने सारा अली खानला नेटकरी ट्रोल करत आहे. अभिनेत्रीने पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![Sara Ali Khan : जय भोलेनाथ! अयोध्येतील राम मंदिरात न जाता सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Sara Ali Khan Seeks Blessings At Grishneshwar Jyotirlinga Temple Actress Shared Photo on Social Media Know Bollywood Entertainment Latest Update Sara Ali Khan : जय भोलेनाथ! अयोध्येतील राम मंदिरात न जाता सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला; नेटकऱ्यांनी घेतली शाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/0264e4124df862bb103a76b0b44bdaef1706078332094254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानचे सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे सारा अली खानने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं (Grishneshwar Jyotirlinga) दर्शन घेतलं आहे.
सारा अली खानचे पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल केलं जात आहे. साराने पूजा करतानाचे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. जय भोलेनाथ, असं कॅप्शन तिने दिलं आहे.
नेटकऱ्यांनी घेतली शाळा
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान, सारा अली खान यांना मात्र आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. दरम्यान सारा अली खानने वेरुळमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं.
अल्लाहला काय उत्तर देणार?, मुस्लिम के नाम पर धब्बा हो, नावातलं अली काढून टाक, जय श्रीराम, हर हर महादेव, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी साराच्या पोस्टवर केल्या आहेत. नेटकऱ्यांनी साराची शाळा घेतली असली तरी काही चाहत्यांनी मात्र तिचं कौतुक केलं आहे. एकही दिल है कितनी बार जितोगे, खूप खूप आदर, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सारा विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. सारा-विकीचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सारा सध्या 'स्काय फोर्स' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) दिसणार आहे.
सारा अली खान बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. साराने 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिने एका हिंदू मुलीची भूमिका साकारली होती. साराचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर तिने सिम्बा, कूली नं1, अतरंगी रे या सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली.
संबंधित बातम्या
Koffee With Karan 8 : सैफ अन् अमृताच्या घटस्फोटावर शर्मिला यांनी सोडलं मौन, म्हणाल्या ब्रेकअप सोपं नसतं!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)