Sanjay Dutt : संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले; ट्वीट करत मुन्नाभाई म्हणाले,"मी ठीक आणि निरोगीदेखील आहे"
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं. पण आता त्याने ट्वीट करत या वृत्तावर खुलासा केला आहे.
![Sanjay Dutt : संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले; ट्वीट करत मुन्नाभाई म्हणाले, Sanjay Dutt Denies The Report Of Getting Injured On Set Of KD Says I Am Fine And Healthy Sanjay Dutt : संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले; ट्वीट करत मुन्नाभाई म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/c8de7aa9c766c4301b063526f267e8c41681368548467254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Dutt On Injured : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) 'केडी' (KD) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावर संजय दत्तची ही बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. संजय दत्तला गंभीर दुखापत झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत होते. पण अभिनेत्याने आता ट्वीट करत या वृत्तावर खुलासा केला आहे. संजय दत्त म्हणाला,"मी ठीक आणि निरोगी आहे".
संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले आहे. त्याने ट्वीट करत लिहिलं आहे,"मला गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण या बातम्या निराधार आहेत. मी ठीक आहे आणि निरोगीदेखील आहे. सध्या मी 'केडी' (KD) या सिनेमाचं शूटिंग करत असून सेटवरील सर्व मंडळी माझी काळजी घेत आहेत. माझ्यासाठी तुम्ही चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार".
There are reports of me getting injured. I want to reassure everyone that they are completely baseless. By God’s grace, I am fine & healthy. I am shooting for the film KD & the team's been extra careful while filming my scenes. Thank you everyone for reaching out & your concern.
— Sanjay Dutt (@duttsanjay) April 12, 2023
संजय दत्तच्या 'केडी'चं बंगळुरूमध्ये शूटिंग सुरू
संजय दत्त सध्या बंगळुरूमध्ये 'केडी-द-डेविल' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. प्रेम के दिग्दर्शित या सिनेमात ध्रुव सरजा, शिल्पा शेट्टी आणि रवीचंद्रन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संजय दत्त चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त
बॉलीवूडमध्ये 'मुन्नाभाई' अशी ओळख असलेला सुपरस्टार संजय दत्त शूटिंगदरम्यान जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंगळुरूच्या आसपासच्या भागात 'केडी' या कन्नड सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. यावेळी बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे. बॉम्बस्फोटाचे दृश्य शूट करताना संजय दत्तच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. ही घटना बेंगळुरूमधील मागदी रोड येथे घडली असल्याचं समोर आलं होतं.
संजय दत्तचे आगामी सिनेमे
संजय दत्तने नुकतच 'लियो' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'केडी' आणि 'लियो' या सिनेमा व्यतिरिक्त संजय दत्त द 'गुड महाराजा, घुडचडी' या सिनेमातदेखील झळकणार आहे. तसेच त्याचा 'हेरा फेरी 3' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. रणबीर कपूरच्या 'शमशेरा' सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रोनित रॉय आणि वाणी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
संबंधित बातम्या
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3'मध्ये संजय दत्तची एन्ट्री; गॅंगस्टरच्या भूमिकेत झळकणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)