एक्स्प्लोर

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3'मध्ये संजय दत्तची एन्ट्री; गॅंगस्टरच्या भूमिकेत झळकणार

Sanjay Dutt : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) या सिनेमात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Dutt On Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात सुनील शेट्टी (Suniel Shetty), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) प्रमुख भूमिकेत आहेत. आता या सिनेमात संजय दत्तची (Sanjay Dutt) एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे. 

'हेरा फेरी 3' या सिनेमात संजय दत्त गॅंगस्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. रवी किशनच्या भावाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, "संजय दत्तसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. संजयचा विनोदाचा दर्जा कमाल आहे. अभिनय कौशल्य, उत्तम संवादफेक आणि विनोदाचं अचूक टायमिंग या त्याच्या जमेच्या बाजू आहेत".

'हेरा फेरी 3'बद्दल बोलताना एका मुलाखतीत संजय दत्त म्हणाला होता, "हेरा फेरी 3' हा सिनेमा मी करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी मी उत्सुक आहे. या सिनेमाचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. अक्षय, सुनील आणि परेशसोबत काम करण्यात एक वेगळीच मजा आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

'हेरा फेरी 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'हेरा फेरी' हा सिनेमा 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 2006 साली या सिनेमाचा पुढचा भाग 'फिर हेरा फेरी' प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहे. आता लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

'हेरा फेरी 3' या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा फरहाद सामजी सांभाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 'हेरा फेरी 3' हा विनोदी सिनेमा या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'हेरा फेरी'च्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला सुरुवात; बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor Peddi: 'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
Priya Bapat: वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
Peddi: राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget