एक्स्प्लोर

Pushpa 2 Worldwide Box Office Collection: 'पुष्पा 2' जगभरात बोलबाला, चारच दिवसांत कमावले 800 कोटी; 'हा' टप्पा गाठणारा पहिला भारतीय चित्रपट!

Pushpa 2 Worldwide Box Office Collection:पुष्पा 2 ने अवघ्या चारच दिवसांत भारतीय सिनेमाच्या इतिहासात सगळ्यात मोठा रेकॉर्ड बनवला आहे.

Pushpa 2 Worldwide Box Office Collection: पुष्पा 2 (Pushpa 2) ने अवघ्या चारच दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 800 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. जो रेकॉर्ड बनवायला अनेक सिनेमांना काही महिने लागतात तोच रेकॉर्ड पुष्पा सिनेमाने अवघ्या चारच दिवसांत बनवला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरील पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, "पुष्पा 2 हा 4 दिवसांत जगभरात 829 कोटी रुपयांची कमाई करून 800 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे."

पुष्पा 2 सिनेमाने सगळ्यात कमी वेळेत 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. याआधी अनेक मोठ्या चित्रपटांनी हा आकडा गाठण्यासाठी यावेळी दुप्पट आणि तिपटीने जास्त वेळ घेतला होता.रणबीर कपूरच्या ॲनिमलने 16 दिवसांत 800 कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या जवानाला 11 दिवस लागले तर पठाणला 12 दिवसांचा जगभरातील 800 कोटींचा जादुई आकडा गाठायला लागला. तर ज्युनियर NTR च्या RRR ला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी 9 दिवस लागले.

सिनेमाचं बजेट किती?

पुष्पा 2 हा सिनेमा 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने ज्या प्रकारे अवघ्या 4 दिवसांत 829 कोटींचा आकडा गाठला आहे.  ते पाहता येत्या काही दिवसांत तो 1000 कोटींचा आकडाही गाठेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. याशिवाय भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर दिग्दर्शक सुकुमार यांच्या चित्रपटाने आतापर्यंत 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे.                                                          

मागील चित्रपटाप्रमाणे, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी 2021 च्या सुपरहिट चित्रपट पुष्पाचा सिक्वेल असलेल्या पुष्पा 2 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे ज्यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत 3 सुपरहिट चित्रपट दिले होते.  

View this post on Instagram
 
A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

ही बातमी वाचा : 

Deepika Padukone : लाडकी लेक आईच्या कुशीत! दुआसोबत दीपिका पादुकोण बंगळुरु एअरपोर्टवर स्पॉट; पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
Embed widget