Nora Fatehi : नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ; तिरंगा उलटा पकडत राष्ट्रध्वजाचा केला अपमान
Nora Fatehi : नोरा फतेहीने राष्ट्रध्वज उलटा पकडल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.

Nora Fatehi : बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. 'फिफा विश्वचषक 2022'मध्ये (FIFA World Cup 2022) भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रध्वज उलटा पकडला होता. त्यामुळे आता नोराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तसेच नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नोरा सध्या कतारमध्ये आहे. 'फिफा विश्वचषक 2022' दरम्यान नृत्य सादरीकरणाचे नोराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान नोराच्या एका चुकीने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. नृत्य सादरीकरणानंतर नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या.
View this post on Instagram
'जय हिंद'च्या घोषणा देताना नोराकडून एक चूक झाली. या एका चुकीमुळे नोरावर प्रचंड टीका होत आहे. 'लाइट द स्काई अँथम'वर थिरकल्यानंतर नोराने तिरंगा फडकवला. या व्हिडीओमध्ये नोराने उत्साहाच्या भरात तिरंगा उलटा पकडलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलचं ट्रोल केलं जात आहे.
नोराने तिरंगा चुकीच्या पद्धतीने उचललेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा एका व्यक्तीच्या दिशेने फेकला आहे. नोराने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. एकीकडे 'जय हिंद'च्या घोषणा देणारी नोरा दुसरीकडे मात्र राष्ट्रध्वजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना पाहून तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे. 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'दिलबर' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.
संबंधित बातम्या
FIFA WC 2022: फुटबॉल विश्वचषकातील मोठा उलटफेर, जपानकडून स्पेनचा पराभव; जर्मनी स्पर्धेतून बाहेर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
