Farhan Akhtar : कोट्यवधींचा बंगला ते दीड कोटींच्या सुपर लक्झरी कारचा मालक आहे फरहान अख्तर
अभिनेता फरहान अख्तर हा कोट्यवधींचा बंगला ते दीड कोटींच्या सुपर लक्झरी कारचा मालक आहे. इतर फिल्म स्टार्सप्रमाणे त्यालाही लक्झरी लाइफस्टाइल जगायला आवडते.
![Farhan Akhtar : कोट्यवधींचा बंगला ते दीड कोटींच्या सुपर लक्झरी कारचा मालक आहे फरहान अख्तर farhan akhtar net worth will blow your mind toofan actor have mumbai bandra bunglow to porsche car Farhan Akhtar : कोट्यवधींचा बंगला ते दीड कोटींच्या सुपर लक्झरी कारचा मालक आहे फरहान अख्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/7c5e62dace008ce560358dc2bc445948_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Farhan Akhtar : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने नुकतेच दुसरे लग्न केले आहे. फरहान याने अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि सर्व शैलींमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. फरहान अख्तरने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर फार कमी वेळात यशाची शिखरे गाठली आहेत. इतर फिल्म स्टार्सप्रमाणे त्यालाही लक्झरी लाइफस्टाइल जगायला आवडते. फरहान अख्तर नेट वर्थ करोडोंच्या बंगल्यांचा तसेच सुपर लक्झरी वाहनांचा मालक आहे.
फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नानंतर मुंबईतील घरी राहत आहे. फरहानने 2009 मध्ये हे घर विकत घेतले होते. 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये वसलेले फरहानचे हे घर अतिशय रॉयल आणि रिच लूक देते.फरहानच्या या घराची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे. फरहानचा बंगला शाहरुख खानच्या मन्नत या घराजवळ आहे.
फरहानला सुपर लक्झरी वाहनांची खूप आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये पोर्श केमॅनचाही समावेश आहे. तिची किंमत 1.5 कोटी रुपये आहे. यासोबतच फरहानकडे लँड रोव्हर रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ एमएल 350 सीडीआय, जीप ग्रँड एसआरटी आणि मर्सिडीज 350 डी सारखी अनेक लक्झरी वाहने आहेत.
फरहान अख्तर 148 कोटींच्या संपत्तीचा मालक असून भारतातच नाही तर परदेशातीलही अनेक प्रॉपर्टीचा तो मालक आहे. फरहान एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रूपये घेतो. त्याची महिन्याभराची कमाई 1.8 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
90s Actress On OTT : माधुरी दीक्षितपासून सुष्मिता सेनपर्यंत, 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा
Netflix Trivia Quest : नेटफ्लिक्स लाँच करणार ‘डेली क्विझ शो’, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)