KKR Vs Kangana Ranaut : 'इमर्जन्सी' हा चित्रपट कंगनाचा सलग 12 फ्लॉप चित्रपट असेल; केकेआरचा कंगनाशी पंगा
Emergency : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित 'इमर्जन्सी' हा चित्रपट कंगना रनौत ( Kangana Ranaut) करणार आहे. त्यावरुन केकेआरने तिच्यावर टीका केली आहे.
मुंबई : स्वत:ला फिल्म क्रिटिक समजणारा आणि सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केकेआरने आता अभिनेत्री कंगना रनौतशी पंगा घेतला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित इमर्जन्सी हा चित्रपट स्वत: कंगना दिग्दर्शित करणार असून त्यामध्ये ती मुख्य भूमिकाही साकारणार आहे. त्यावरुन केकेआरने निशाणा साधत हा कंगनाचा सलग 12 वा फ्लॉप चित्रपट असणार आहे असं म्हटलंय. त्यामुळे आता कंगना आणि त्याच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु होण्याचे संकेत आहेत.
केकेआरने एक ट्वीट करुन त्यात म्हटलंय की, "या आधी मधुर भंडारकरने इंदिरा गांधी यांच्यावर इंदू सरकार हा चित्रपट बनवला होता. तो पहायला कुत्रंही गेलं नाही. आता त्याच विषयावर कंगना चित्रपट बनवत आहे. याचा अर्थ ती आपला सलग 12 वा फ्लॉप चित्रपट देत आहे. तिचे या आधीचे 11 चित्रपट सुपर-डुपर फ्लॉप होते."
Director #MadhurBhandarkar made film #InduSarkar on #IndiraGandhi and emergency, Aur Kutta Bhi Dekhne Nahi Gaya! Now Deedi #KanganaRanaut is making film on the same subject. Means she wants to make 12th flop in the row. Her last 11 films are super flop!
— KRK (@kamaalrkhan) June 27, 2021
केकेआरने नुकतंत सलमान खानच्या राधे या चित्रपटावर टीका केली होती तसेच त्याच्यावर काही व्यक्तिगत आरोपही केले होते. त्यानंत केकेआरने अर्जुन कपूर आणि मलायका आरोराच्या संबंधावर टिप्पणी केली होती. आता केकेआरने कंगनाशी पंगा घेतला आहे.
कंगना रनौत आपल्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या चित्रिकरणात दंग आहे. तिने नुकतंच त्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. आता तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार असल्याचं जाहीर केलंय. सोशल मीडिया कू वर लिहताना ती म्हणते की, "मी आता पुन्हा दिग्दर्शनाची हॅट डोक्यावर घालायची ठरवलं आहे. जवळपास एक वर्षं या इमर्जन्सी चित्रपटावर मी काम करते आहे. त्यानंतर आता मी या निष्कर्षाला पोचले आहे की लेखक रितेश शाह यांचं लिखाण आता मी दिग्दर्शित करेन. हा प्रोजेक्ट घेतल्यामुळे मला अभिनयाच्या काही गोष्टींशी तडजोड करावी लागेल. पण मला ती मान्य आहे. हा सिनेमा एक उच्च कोटीचा सिनेमा होणार आहे. माझ्या अपेक्षा आता पुरेपूर उंचावल्या आहेत."
महत्वाच्या बातम्या :