एक्स्प्लोर
In Pics | चिखलदऱ्यात साकारतोय जगातला तिसरा आणि भारतातला पहिला स्काय वॉक, पाहा फोटो

Chikhaldara sky walk
1/7

विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
2/7

हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
3/7

मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावीत करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
4/7

भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगन भरारी पूल आहे.. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
5/7

स्काय वॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातूनच नव्हे तर परदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
6/7

जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा असला तरी जगातील सर्वांत मोठा स्कायवॉक ठरणार आहे. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
7/7

चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा येथे दोन टेकड्यांना जोडणारा हा भारतातील पहिला स्काय वॉक राहणार आहे. गोरा घाट पॉईंट पासून तर हरिकेन पॉईंट पर्यंत पाचशे मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. पुढील वर्षात स्कायवॉक पर्यटनासाठी तयार असणार आहे. (ड्रोन सौजन्य राहुल ढवळे)
Published at : 26 Jun 2021 10:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
