(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूट्यूबर भूवन बामला डेट करतेय अमिषा पटेल? रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
Ameesha Patel Dating Bhuvan Bam? Netizens Reaction : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान बिझनेसमनला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.
Bollywood Actress Dating 19 Years Old Businessman : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्यांची पर्सनल लाईफही तितकीच चर्चेत असते. आता आणखी एक अभिनेत्री तिच्या डेटींग लाईफमुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान बिझनेसमनला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान तरुणाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. या तरुण प्रसिद्ध बिझनेसमन आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यानंतर तिच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.
अभिनेत्री अमिषा पटेल 19 वर्षांनी लहान बिझनेसनमनला करतेय डेट
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कायमच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. आता अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तरुणासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. इतकंच नाहीतर, या फोटोला आमिषाने रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. अमिषा पटेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर निर्वाण बिर्ला याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमिषा पटेलने कॅप्शन देत लिहिलंय, "दुबईमध्ये माझ्या डार्लिंग निर्वाणसोबत सुंदर संध्याकाळ".
रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला शेअर
अभिनेत्रा अमिषा पटेलने निर्वाण सोबतचा फोटो शेअर करताच, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा फोटो पाहता नेटकऱ्यांनी अमिषा पटेल आणि निर्वाण एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्या वयात 19 वर्षांचा फरक आहे. अमिषा पटेल सध्या 49 वर्षांची आहे, तर निर्वाण बिर्ला 30 वर्षांचा आहे. या दोघांच्या वयातील 19 वर्षांच्या फरकामुळे हे रुमर्ड कपल प्रचंड चर्चेत आलं आहे.
अमिषा पटेल आणि निर्वाण बिर्ला यांच्या डेटिंगच्या चर्चा
View this post on Instagram
रोमँटिक फोटो शेअर करताच चर्चांना उधाण
अमिषा पटेलने सोशल मीडियावर बिझनेसमन निर्वाण बिर्लासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत. दुबईमध्ये काढलेल्या फोटोमध्ये निर्वाणने अमिषाला मिठी मारल्याचं दिसत आहे. आता या दोघांच्या वयातील लक्षणीय फरक पाहता काही चाहते डेटिंगच्या चर्चांना पाठिंबा देत आहेत, तर काही अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असल्या, तरी या दोघांनीही अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
यूट्यूबर भूवन बामला डेट करतेय अमिषा पटेल?
अमिषा पटेल आणि निर्वाण बिर्ला यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी अभिनेत्रीला प्रेम मिळालं म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी वयातील फरकामुळे तिच्यावर टीका केली आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांना या फोटोतील तरुण यूट्यूबर भूवन बाम असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलंय, "अरे हा तर भूवन बाम वाटत आहे". आणखी एकाने लिहिलंय, "पण तो तुझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे". दुसऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय, "एक सेकंदासाठी मला हा भूवन बाम वाटला". काही नेटकऱ्यांनी अमिषाला शुभेच्छा देत म्हटलंय, "अखेर तुला तुझा जीवनसाठी मिळाला" तिसऱ्याने लिहिलंय, "मी तुझ्यासाठी आनंदी आहे.
कोण आहे निर्वाण बिर्ला? ( Who Is Ameesha Patel's Rumoured Boyfriend Nirvaan Birla)
निर्वाण बिर्ला दिग्गज बिझनेस ग्रुपचे यशोवर्धन बिर्ला यांचा मुलगा आहे. निर्वाण बिर्ला वयाच्या 20 व्या वर्षापासून बिर्ला ग्रुपच्या बिझनेसमध्ये हातभार लावत आहे. निर्वाण 'बिर्ला ओपन माइंड्स एज्युकेशनचा संस्थापक (Founder) आणि व्यवस्थापकीय संस्थापक (Managing Director) आहे. निर्वाण बिर्ला सध्या 30 वर्षांचा आहे. निर्वाण एक गायक असण्यासोबत हार्मोनियम वादकही आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :