(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adipurush : अमर है नाम, जय सिया राम! भांगेत कुंकू, पाणावलेले डोळे; 'आदिपुरुष' सिनेमातील सीतामातेच्या पोस्टरने वेधलं लक्ष
Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सीतामातेच्या या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Adipurush Movie New Poster : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहच आहे. या सिनेमासंबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राम नवमीनिमित्त या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात सीतामातेच्या या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सीतामातेच्या पोस्टरमध्ये काय आहे?
कृती सेननने 'आदिपुरुष' सिनेमाचं नवं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सीतामातेच्या भूमिकेत दिसत आहे. साडी, भांगेत कुंकू, पाणावलेले डोळे असा काहीसा या पोस्टमधील कृती सेननचा लूक आहे. 'आदिपुरुष' सिनेमातील सीतामातेचं पोस्टर शेअर करत कृती सेननने लिहिलं आहे,"अमर है नाम, जय सिया राम". तर मोशन पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"सीता राम चरित अति पावन".
View this post on Instagram
आधी टिका मग बदल...
'आदिपुरुष' सिनेमाचे एक पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टरमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. पण आता नवं पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
'आदिपुरुष'च्या 'त्या' पोस्टरमध्ये नक्की काय होतं?
'आदिपुरुष' सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसत होता. तर कृती सेनने सीता मातेच्या भूमिकेत दिसून आली होती. 'आदिपुरुष' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर पोस्टरमधील व्यक्तिरेखांपैकी जानवे परिधान केलेले दिसून आलेले नाहीत. तसेच सीतेच्या भांगेत कुंकूदेखील नव्हतं.
'आदिपुरुष' कधी प्रदर्शित होणार? (Adipurush Release Date)
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता लवकरच हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रामायणावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे.
संबंधित बातम्या