Jewel Thief : जखमी झाल्यानंतर वाघ परतला! सैफ अली खानच्या 'ज्वेल थिफ' चित्रपटाचा टिझर रिलीज, 'नवाब'च्या डॅशिंग लुकची चर्चा!
Jewel Thief - The Heist Begins Official Teaser Out : अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला ज्वेल थिफ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

Jewel Thief - The Heist Begins Official Teaser Out : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान चांगलाच चर्चेत आहे. त्याच्यावर राहत्या घरात चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यात तो चांगलाच जखमी झाला होता. दमरम्यान शस्क्रक्रिया केल्यानंतर आता त्याची प्रकृती चांगली आहे. अलिकडेच तो आपली पत्नी करिना कपूरसोबत एका कार्यक्रमात दिसला होता. दरम्यान, एकीकडा सैफ अली खानवरील या हल्ल्याची संपूर्ण भारतात चर्चा असताना आता त्याच्या बहुप्रतिक्षित 'ज्वेल थिफ- द हाईस्ट बिगिन्स' चित्रपटाचा टिझर रिलिज झाला आहे.
चित्रपटाचा टिझर रिलीज
गेल्या अनेक दिवसांपासून सैफ अली खानच्या 'ज्वेल थिफ- द हाईस्ट बिगिन्स' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा होती. असे असतानाच आता या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही सार्वजनिक केला जाणार आहे. विशेष म्हणजे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकूण 1 मिनिट सात सेकंदांचाहा टिझर आहे.
चित्रपटाची कथा काय आहे?
सध्या प्रदर्शित झालेल्या टिझरनुसार या चित्रपटात चोरीचा थरार दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुद्द सैफ अली खानच या चित्रपटाच चोराची भूमिका निभावत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरीदरम्यानच थरार या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत निकिता दत्ता ही नायिकेच्या भूमिकेत दिसेल. सोबतच या चित्रपटात कसलेला अभिनेता म्हणून ओळख असलेला जयदीप अहलवातही दिसेल.
लवकरच चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार
दरम्यान, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर कधी रिलीज होणार, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. मात्र आगामी काळात लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सैफ अली खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
ती हिरोपेक्षाही जास्त फी घ्यायची, पण प्रेमानं लावली करिअरला उतरती कळा; 'ही' हिरोईन आता काय करतेय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
