मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
Kanye West and Bianca Censori : 2025 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समधून गायक कान्ये वेस्ट आणि बियांका यांना बाहेर काढण्यात आलं. रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घातल्याने उपस्थितांना धक्का बसला.

Bianca Censori Transperant Dress in Grammys 2025 : अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी ऑस्ट्रेलियन मॉडल बियांका यांना ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मॉडल बियांका हिने 2025 ग्रॅमी अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला. तिच्या या ड्रेसमुळे सर्वांनाच धक्का बसला, यानंतर दोघांनाही शोमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट आणि ऑस्ट्रेलियन मॉडेल बियांका सेन्सारी यांनी ग्रॅमी अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वांचे लक्ष वेधलं, पण त्यांच्यावर टीका देखील होत आहे. बियांकाने रेड कार्पेटवर इतका पारदर्शक ड्रेस घातला होता की, सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ग्रॅमी अवॉर्ड्समधून कान्ये वेस्ट अन् बियांकाची हकालपट्टी
ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडत असताना रेड कार्पेटवर जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी कान्ये वेस्ट आणि बियांका हे चर्चेचा विषय ठरले. ऑस्ट्रेलियन मॉडल बियांका हिने ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2025 च्या रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला. स्किन कलरच्या ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये बियांकाला पाहताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना बाहेर काढलं. बियांकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात
रेड कार्पेटवर कान्येने पूर्णपणे काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि त्यात डायमंड चेन होती. त्याच वेळी, त्याची पत्नी बियान्का हिने पूर्णपणे पारदर्शक मिनी ड्रेसमध्ये धाडसाची मर्यादा ओलांडली. ती एका लांब काळ्या फर कोटमध्ये आली, जो तिने नंतर काढला. एंटरटेनमेंट टुनाईटने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये या घटनेची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कान्ये वेस्ट आणि बियांका सेन्सोरीसह पाच जणांना रेड कार्पेटवर आल्यानंतर तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले. नंतर त्याने इंस्टाग्राम पोस्ट देखील डिलीट केली.
कान्येला दोन पुरस्कारांसाठी नामांकन
या पुरस्कार सोहळ्यात कान्ये वेस्टला दोन पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आहे. त्याला सर्वोत्कृष्ट रॅप गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे. "कार्निव्हल" या चित्रपटात टाय डोला साइनसोबतच्या गाण्यासाठी कान्येला सर्वोत्कृष्ट रॅप गाण्यासाठी नामांकन मिळालं आहे. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, जर त्याने हा पुरस्कार जिंकला तर तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाणार नाही.
बियांकाच्या ड्रेसवरून वाद : कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण
लाईव्ह रेड कार्पेट कार्यक्रमादरम्यान, तो ग्रॅमी रेड कार्पेटवर पूर्णपणे काळ्या रंगाच्या कॅज्युअल पोशाखात पोहोचला होता. तर, कान्येची पत्नी बियांकाने तिच्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने लांब काळ्या कोटखाली एक पारदर्शक ड्रेस घातला होता, ज्यामध्ये जवळजवळ सर्वकाही दिसत होते. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळेही वाद निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























