एक्स्प्लोर

Dhaakad Vs Bhool Bhulaiyaa 2 : कंगना आणि कार्तिकची बॉक्स ऑफिसवर टक्कर, ‘धाकड’ विरुद्ध ‘भुलभुलैया 2’! कोण मारणार बाजी?

Dhaakad Vs Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा 'धाकड' (Dhaakad) आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हे चित्रपट आज (20 मे) थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत.

Dhaakad Vs Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा 'धाकड' (Dhaakad) आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हे चित्रपट आज (20 मे) थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच, बॉक्स ऑफिसवर कंगना आणि कार्तिक यांच्यापैकी कोण बाजी मारतो, हे पाहणे देखील लक्षवेधी ठरणार आहे. आजचा दिवस मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे.

एकीकडे कंगनाचे चाहते तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाची आतुरतेने वात पाहत होते. या चित्रपटाची शूटिंग सुरु झाल्यापासून कंगना प्रचंड चर्चेत होती. तर, दुसरीकडे अक्षय कुमार याच्या अभिनयाने गाजलेल्या ‘भूलभुलैया’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तुम्ही देखील कोणता चित्रपट आधी पाहावा या विचारात असाल, तर आधी या चित्रपटांची पार्श्वभूमी जाणून घेऊया..

‘धाकड'

‘पंगा’ क्वीन’ कंगना रनौत हिचा 'धाकड' हा चित्रपट एक बॉलिवूड अॅक्शन ड्रामा आहे, ज्याचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे. या चित्रपटात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारत आहे. जर, तुम्हाला अॅक्शन आणि मारधाड आवडत असेल, तर कंगनाचा हा चित्रपट आधी पाहणे योग्य ठरेल.

'भूल भुलैया 2'

'भूल भुलैया 2' हा प्रियदर्शन दिग्दर्शित 2007मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘भूल भुलैया 2’मध्ये कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जर, तुम्ही देखील मोंजोलिकाचे चाहते असाल आणि अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ तुमचा आवडता चित्रपट असेल, तर हा चित्रपट आधी पाहणे तुम्हाला नक्कीच आवडेल. शिवाय ज्यांना विनोदी चित्रपट पहायचे आहेत, ते देखील हा चित्रपट पाहू शकतात.

हेही वाचा :

Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

PHOTO : छबिदार सुरत देखणी... अभिनेत्री रसिका सुनीलचं दिलखेचक फोटोशूट!

Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget