Dharmaveer : आनंद दिघे प्रसाद ओकने रुपेरी पडद्यावर केले जिवंत : उद्धव ठाकरे
Dharmaveer : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील 'धर्मवीर' सिनेमाची भुरळ पडली आहे.
![Dharmaveer : आनंद दिघे प्रसाद ओकने रुपेरी पडद्यावर केले जिवंत : उद्धव ठाकरे Anand Dighe Prasad Oak performed on the silver screen alive said Uddhav Thackeray Dharmaveer : आनंद दिघे प्रसाद ओकने रुपेरी पडद्यावर केले जिवंत : उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/3e893f975c0f48f97487235aed4abe5b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharmaveer : दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे (Anand Dighe) प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी रुपेरी पडद्यावर जिवंत केले आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट पाहिल्यानंतर दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंची भूमीका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकचे भरभरून कौतुक देखील केले.
आयनॉक्समध्ये मुख्यमंत्र्यांसाठी खास ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’या सिनेमाच्या शो चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान रश्मी ठाकरे आणि नगरविकासमंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. सिनेमा पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाददेखील साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं प्रेक्षकांना 'धर्मवीर' सिनेमात पाहायला मिळणार आहे. मला लाभलेले अनेक शिवसैनिक आनंद दिघेंच्या मुशीत तयार झाले आहेत. धर्मनिष्ठा, संघटना आणि जनतेवर निस्सीम प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत.
उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा
बाळासाहेब आनंद दिघेंवर अनेकदा चिडायचे. आनंद दिघे दिलेल्या वेळेत कधीच पोहचत नसत. पण आनंद दिघेंवर बाळासाहेबांचा खूप विश्वास होता. गुरु शिष्यापेक्षा अधिक घट्ट त्याचं नातं होतं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आनंद दिघेंच्या बारीक-सारिक लकबी प्रसाद ओकने आत्मसात केल्या आहेत. 'धर्मवीर' सिनेमातील प्रसाद ओक यांची भूमिका अप्रतिम आहे. सिनेमातील 'प्रत्येक शहरात एक आनंद दिघे हवेत' हा डायलॉग खूप आवडला. ज्यावेळी आपल्या शहरात आनंद दिघे असतील असं त्या शहरातल्या गुडांना वाटेल त्यावेळी आनंद दिघे नावाचा धाक दरारा त्या शहरातील माता भगिनींचे रक्षण करेल.
मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचा शेवट पाहिला नाही
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचा शेवट न पाहिल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, मी जाणून बुजून सिनेमाचा शेवट पाहिलेला नाही. तो फारच त्रासदायक आहे. व्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वतः बाळासाहेब देखील फार भावुक झाले होते. त्याचे वर्णन करू शकत नाही.
संबंधित बातम्या
Dharmaveer : 'धर्मवीर'ची भुरळ मुख्यमंत्र्यांनाही; सिनेमा पाहायला उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरे थेट सिनेमागृहात
Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)