Amol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv Sena
Amol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv Sena
दलाली करणाऱ्या फिक्सरची ओसडी किंवा पीएस म्हणून नियुक्ती होऊन देणार नाही असा पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला. याच मुद्द्याला हात घालत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला घेरलं असताना, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मोठा बॉम्ब फोडलाय.. रोहयो मंत्री असताना संदीपान भुमरेंच्या तत्कालीन ओएसडीनं ५ कोटींच्या कामासाठी ५ लाखांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. आता संदीपान भुमरेंनंतर अमोल मिटकरींनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी पाटबंधारे मंत्री संजय राठोड, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींचं नाव घेतलंय. या मंत्र्यांच्या ओएसडींचा अनुभव चांगला नव्हता असा गंभीर आरोप करत अमोल मिटकरींनी अप्रत्यक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य केलंय.





















