Shivshahi Bus Fire : मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बस जळून खाक, सांगलीत CNG व्हॅगनारला आग, चालकाचा गाडीत जळून मृत्यू
Shivshahi Bus Fire : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आणि कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्याजवळची घटना Wagon R जळून खाक झाली. तर मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बस जळून खाक झालीये.
Shivshahi Bus Fire : सांगलीतील (Sangli) कवळे महांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी असलेल्या व्हॅगनार गाडीचा (Wagon R Fire) अपघात झाला. त्यानंतर अपघात झाल्यानंतर स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. दरम्यान, या आगीत गाडीतील चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तर दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बस जळून खाक झालीये.
सीएनजी असलेल्या व्हॅगनार गाडीचा स्फोट
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्याजवळची घटना
गाडीतील चालकाचा गाडीतच जळुन मृत्यू झाला
मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बस जळून खाक
मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग (Shivshahi Bus Fire) लागलीये. भीषण आगीत शिवशाही बस अक्षरश: जाळून खाक झालीये. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही बस धुळ्याकडून शिरपूरला जातं होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही..
अकोल्यात बर्निंग मिनी ट्रकचा थरार
दोन अपघातात गाड्यांना आग लागलेली असतानाच अकोल्यात देखील बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय. अकोल्यातल्या मुर्तिजापूर-अमरावती राष्ट्रीय महार्गावरील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ भीषण अपघात झालाय. अकोल्यावरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या कॉटन मालवाहू ट्रकचे समोरील टायर फुटल्याने घडला अपघात.. हा अपघात इतका भीषण होता की मालवाहू वाहन रस्त्यावरील डिवाइडरला धडकून पलटी झालाय.. वाहनाला आग लागलीय. यात मालवाहू पूर्णतः जळून खाक झाले आहे, मात्र सुदैवाने चालक वाचला आहे.. घटनास्थळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसल्याने नुकसान मोठे झाले. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. सदर वाहन गुजरातवरून पश्चिम बंगालला कॉटन कपडे घेऊन जात होते.
याशिवाय मुंबईच्या कांदिवली पूर्वेत ठाकूर व्हिलेजमध्ये भरधाव वेगाने जात असलेल्या कारला मोठी आग लागली. आगीच्या माहिती मिळताच कार चालक सुखरूप बाहेर निघाला..संध्याकाळी 8 च्या सुमारास ही आग लागली,आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन 20 ते 25 मिनटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत...या आगीमध्ये कार जळून खाक झाली. मात्र आग कशामुळे लागली या संदर्भात स्थानिक पोलीस तपास करत आहेत...
इतर महत्त्वाच्या बातम्या