एक्स्प्लोर

Kalyan Crime : कल्याणमध्ये शुक्लानंतर आता पांडे; परप्रातियांचा हैदोस सुरुच, चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला मारहाण, पोलिस सुद्धा जखमी

Marathi Family Beaten in Kalyan Crime : कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Marathi Family Beaten in Kalyan Crime : कल्याणमध्ये (Kalyan Crime) पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतियांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला (Marathi Family) मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार (Marathi Family Beaten in Kalyan Crime ) समोर आलाय. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात उत्तम पांडे (Uttam Pandey) आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मराठी कुटुंबातील तरुणाची आई आणि पत्नी सुद्धा जखमी 

याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तर तरुणाच्या पत्नीला आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय. 

काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्याकडून मराठी कुटुंबाला गुंड आणून मारहाण 

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशाच प्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संबंधित एमटीडीसीच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.  

एमटीडीसीमध्ये अधिकारी असलेला  अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत एकमेकांचे शेजारी आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करत असाताना धूप लावत असतात. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या घरात जात असल्याने  गीता यांच्या घरातील तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग; राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola : धक्कादायक! गुप्तधन प्रकरणाचा तपास, अकोला पोलिसांकडून बुलढाणा पोलिसांवर हल्ला
धक्कादायक! गुप्तधन प्रकरणाचा तपास, अकोला पोलिसांकडून बुलढाणा पोलिसांवर हल्ला
Santosh Deshmukh : ...तर संतोष देशमुख हत्येची केस मागे घ्या; बीडमधील आरोपींचा प्रस्ताव, तुरुंगातून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा मोठा दावा
...तर संतोष देशमुख हत्येची केस मागे घ्या; बीडमधील आरोपींचा प्रस्ताव, तुरुंगातून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा मोठा दावा
Pune Crime News: प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
Ashok Kharat Nashik Crime: अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार
अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget