एक्स्प्लोर
Nagpur Violence: नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
Nagpur Violence: महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली. दोन गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Nagpur Violence
1/9

नागपूरमधील सोमवारी (17 मार्च) झालेल्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे.
2/9

आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आलीय.
3/9

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला. महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली. दोन गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दगडफेकीमुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरल्या. अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
4/9

भालदारपुरा भागातील एका घरातील काचांची तोडफोड झाली. घराबाहेर उभे असलेल्या कारवर मोठा दगड टाकून तोडफोड झाली. जवळपास 30 ते 35 किलोंचा हा दगड होता.
5/9

कार पेटवून दिल्यानंतर घरातील भिंतींवर काळं जाळ पसरलं आहे.
6/9

जाळपोळ, दगडफेक करण्याआधी हल्लेखोरांनी घराबाहेरील सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न झाला.
7/9

नागपुरातील घटना अयोग्य असून सर्वांनी शांतात राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राड्यानंतर केलं. तर नागपूरकरांनी सहकार्य करावं, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
8/9

दरम्यान, नागपूर राड्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल बैठक पार पडली. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीला उपस्थित होते. नागपूर राड्यावर सरकारने कठोर भूमिका घेतलीय.
9/9

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत. बावनकुळे सकाळी दहा वाजता महाल भागाची पाहणी करणार आहेत.
Published at : 18 Mar 2025 09:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion