मोठी बातमी : माझी प्रेयसी तू पटवली, कॉलेजच्या पोरांचा राडा, वादावादीत थार अंगावर घातली!
Kalyan Crime News : शहारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कल्याण मधील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलींवरून वाद (Crime) झाल्याची घटना घडलीय.
![मोठी बातमी : माझी प्रेयसी तू पटवली, कॉलेजच्या पोरांचा राडा, वादावादीत थार अंगावर घातली! Kalyan Crime news Minor disputes over girlfriend college youth tried to drive the thar car over the body of the other youth मोठी बातमी : माझी प्रेयसी तू पटवली, कॉलेजच्या पोरांचा राडा, वादावादीत थार अंगावर घातली!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/f7a6858b8be066095e823c1f42ad16701738065235489892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण: शहारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कल्याण मधील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलींवरून वाद (Crime) झाल्याची घटना घडलीय. मात्र हा वाद एवढा विकोपाला (Kalyan Crime) गेला की कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलीस (Kalyan Police) प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
वादावादीत चक्क थार अंगावर घातली!
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये हे दोन विद्यार्थी शिकत असून एका मुलीवर या दोघा मुलांचं प्रेम आहे. दरम्यान, माझी प्रियसी तू पटवली असा वाद त्यांचा सुरू झाला आणि या वादातून सुयश जयेश तिवारी या कॉलेज तरुणाने दुसऱ्या तरुणावर कल्याण लोकग्राम परिसरामध्ये थार ही कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दोन्ही तक्रारदारांकडून तक्रार नाही, अदखलपात्र गुन्हा दाखल
दरम्यान घटनेतील सुयश जयेश तिवारी आणि पीडित तरुण हे दोघेही कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. या घटनेबाबत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारदार तक्रार देत नसून जबाब नोंदवून घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.
किरकोळ वाद विकोपाला; रागाच्या भरात जावयाने केली सासऱ्याची हत्या
किरकोळ वादाच्या कारणावरून जावयाने सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून सासर्याची हत्या केल्याची घटना यवतमाळच्या जवाहर नगर येथे घडली आहे. दिलीप पुरुषोत्तम वाडेकर (55)असे हत्या झालेल्या सासऱ्याचे नाव आहे, तर रचीद्र झिबलकर (29)असे मारेकरी जावयाचे नाव आहे.
मारेकरी रचीद्र झिबलकर हा पत्नीसोबत वाद करीत तिला नेहमी मारीत होता. त्यामुळे मृतक दिलीप वाडेकर हा मुलीला घेण्यासाठी जवाहरनगर येथे आले होते. आरोपी रचीद्र झिबलकर याने मृतकसोबत वाद घालीत कुऱ्हाडीचे घाव घालून सासऱ्याची हत्या केलीय. हा रक्तरंजित थरार यवतमाळच्या जवाहरनगर भारी परिसरात 27 जानेवारीच्या रात्रीच्या दरम्यान घडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)