एक्स्प्लोर

धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

या घटनेनं शिक्षण क्षेत्रात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या स्तराला पोहचलीय, याची चर्चा सुरू झालीय. 

पुणे : दौंडमध्ये विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना (Teacher) सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 22 जानेवारी रोजी दौंड (Daund) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला. मात्र,आपल्या शाळेची (School) बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला.दरम्यान, विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनं शिक्षण क्षेत्रात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या स्तराला पोहचलीय, याची चर्चा सुरू झालीय. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

दौड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले. संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, फिर्यादी स्वत:ही शिक्षक आहेत.

मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतुने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक डीमोलो जोवीन, वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime : तब्बल 33 वर्षानंतर आली प्रशासनाला जाग, मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर तीन गुन्हे दाखल; बुलढाण्यात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 33 वर्षानंतर आली प्रशासनाला जाग, मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर तीन गुन्हे दाखल; बुलढाण्यात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार, पोलीस घटनास्थली दाखल 
धक्कादायक! पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार, पोलीस घटनास्थली दाखल 
Jalna Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, जालन्यातील नराधम शिक्षकाला बेड्या 
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, जालन्यातील नराधम शिक्षकाला बेड्या 
तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, FDI च्या अधिकाऱ्यांनाही इशारा
तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, FDI च्या अधिकाऱ्यांनाही इशारा

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget